ब्रेकिंगस्पर्धा परीक्षा देणाऱ्यांनीही घेतला पोलीस भरती प्रक्रियेत सहभाग; 64 पदांसाठी आले 5...

स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांनीही घेतला पोलीस भरती प्रक्रियेत सहभाग; 64 पदांसाठी आले 5 हजार 857 अर्ज …!

spot_img

अहमदनगर जिल्हा पोलीस शिपाई आणि बँड्समन यांची 25 पदं तसंच पोलीस शिपाई चालक यांच्या 39 पदांसाठी नगरच्या पोलीस भरती प्रक्रियेत तब्बल 5 हजार 857 अर्ज आले आहेत. विशेष म्हणजे जे विद्यार्थी एमपीएससी आणि युपीएससी या स्पर्धा परीक्षा देत आहेत, त्या विद्यार्थ्यांनीदेखील या पोलीस भरतीत सहभाग घेतलाय.

काल दि. 19 जुनपासून सुरु झालेल्या पोलीस भरती प्रक्रियेवर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्यासह अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, शहर विभागाचे डिवाएसपी अमोल भारती, श्रीरामपूरचे डिवाएसपी बसवराज शिवपुजे आदी अधिकारी बारकाईनं लक्ष ठेवून आहेत.

दरम्यान, या पोलीस भरती प्रक्रियेअंतर्गत आज (दि. २०) लेखी परीक्षा आणि मैदानी चाचणीला सुरुवात झाली. या पोलीस भरती प्रक्रियेत अहमदनगर जिल्हा पोलीस शिपाई आणि बँड्समन यांच्या 25 जागा, पोलीस शिपाई चालक यांच्या 39 जागा आहेत. त्यासाठी एकूण 5 हजार 857 अर्ज प्राप्त झालेले आहेत. पोलीस भरतीची ही प्रक्रिया दिनांक 27 जूनपर्यंत चालणार आहे. उद्या (दि. २१) पोलीस शिपाई चालक पदासाठीची परीक्षा घेण्यात येणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या सहकाऱ्यांनी ‘मायक्रो प्लॅनिंग’ आणि ‘टीमवर्क’ करून पुन्हा एकदा खेचून आणला दणदणीत विजय..!

आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या सहकाऱ्यांनी 'मायक्रो प्लॅनिंग' आणि 'टीमवर्क' करून पुन्हा एकदा खेचून आणला...

लोकसभेच्या निवडणुकीत झालेली चूक अखंड समाजाने विधानसभेला भरून काढली… भाजपा आणि महायुतीच्या पारड्यात भरभरून मतदान – अमित गोरखे 

लोकसभेच्या निवडणुकीत झालेली चूक अखंड समाजाने विधानसभेला भरून काढली... भाजपा आणि महायुतीच्या पारड्यात भरभरून मतदान...

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास अहिल्यानगर - राजा शिवछत्रपती परिवार व स्नेहबंध सोशल...