सेवानिवृत्त उपविभागीय अधिकाऱ्यावर पत्नीसह अपसंपदेचा गुन्हा अहवाल
(DPA CASE REPORT)
➡ युनिट:-
नांदेड
➡ तक्रारदार:-
श्री संदिप बाबूराव थडवे,
पोलीस निरीक्षक,
अँटी करप्शन ब्युरो, नांदेड
➡ आरोपी:-
1. नारायण यशवंत राऊत, वय 62 वर्षे, सेवानिवृत्त उप विभागीय अधिकारी, उर्ध्व पैनगंगा प्रकल्प क्र. 19, मुदखेड, ता.मुदखेड जि. नांदेड (वर्ग -1)
2. सौ. सुनिता भ्र.नारायण राऊत, वय 54 वर्षे, व्यवसाय गृहीणी, दोघे रा. सहयाद्री नगर, नांदेड
➡ निरीक्षण कालावधी
(Check Period):-
दि. 01/07/2001 ते 05/09/2019
➡ निष्पन्न अपसंपदा/बेहिशोबी मालमत्ता:-
कायदेशीर उत्पन्नाचे तुलनेत 40.43% किंमतीची बेहिशोबी मालमत्ता
➡ गुन्हा रजि. नंबर:-
पोलीस स्टेशन भाग्यनगर, जि.नांदेड,
गु.र.नं. 273/2024
कलम 13(1)(इ) सह 13(2) भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, 1988, 109 भादंवि व कलम 13(1)(ब) सह 13(2),12 भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, 1988 (सुधारित अधिनियम सन 2018)
➡ थोडक्यात हकिकत:-
यातील आरोपी लोकसेवक श्री नारायण यशवंत राऊत, सेवानिवृत्त उप विभागीय अधिकारी, उर्ध्व पैनगंगा प्रकल्प क्र. 19, मुदखेड, ता.मुदखेड जि. नांदेड (वर्ग -1) यांनी संपादित केलेल्या मालमत्तेबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड कार्यालयाकडून उघड चौकशी करण्यात आली होती. लोकसेवक यांनी संपादित केलेली मालमत्ता कायदेशीर स्त्रोताद्वारे संपादित केली किंवा कसे याबाबत त्यांना वेळोवेळी संधी देवून माहिती घेण्यात आली होती. परंतु त्यांनी संपादित केलेल्या मालमत्तेबाबत ते पुष्टीदायक पुरावे सादर करू शकले नाहीत. त्यांनी लोकसेवक पद धारण केलेल्या कालावधीत त्यांना प्राप्त असलेल्या कायदेशीर उत्पन्नापेक्षा जास्त किंमतीची मालमत्ता स्वतःचे नावे, पत्नी सौ.सुनिता नारायण राऊत यांच्या नावे संपादित केल्याचे उघड चौकशी अंती निष्पन्न झाले आहे. त्यांनी संपादित केलेली रू. 61,23,779/- किंमतीची बेहिशोबी मालमत्ता ही त्यांच्या कायदेशीर उत्पन्नाच्या तुलनेत 40.43% जास्त असल्याचे चौकशी अंती निष्पन्न झाले आहे.
सदरहू विसंगत बेहिशोबी मालमत्ता संपादित करण्यासाठी आरोपी लोकसेवक नारायण यशवंत राऊत यांना त्यांची पत्नी सौ.सुनिता नारायण राऊत यांनी मदत करून गुन्हयास प्रोत्साहित करून अपप्रेरणा दिली आहे.
म्हणून त्या दोघांचे विरूध्द वरील प्रमाणे अपसंपदेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कायदेशीर प्रक्रिया चालु आहे.
➡मार्गदर्शक:-
डॉ.राजकुमार शिंदे भापोसे
➡ पर्यवेक्षण अधिकारी:-
श्री राजेंद्र पाटील,
पोलीस उप अधीक्षक,
➡ तपास अधिकारी:-
श्री गजानन बोडके,
पोलीस निरीक्षक,
अँटी करप्शन ब्युरो, नांदेड