लेटेस्ट न्यूज़सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार महाराष्ट्रात आरक्षण उपवर्गीकरण ताबडतोब लागू करा..! सकल मातंग...

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार महाराष्ट्रात आरक्षण उपवर्गीकरण ताबडतोब लागू करा..! सकल मातंग समाजाचा जनआक्रोश मोर्चात लाखो नागरिकांची मागणी:

spot_img

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार महाराष्ट्रात आरक्षण उपवर्गीकरण ताबडतोब लागू करा..!सकल मातंग समाजाचा जनआक्रोश मोर्चात लाखो नागरिकांची मागणी:

राज्यात सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक स्तरावर मागास राहिलेल्या मांग, मातंग, व इतर समाजाला आरक्षणाचे वर्गीकरण करून न्याय द्यावा, या प्रमुख मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानात आज मंगळवारी (ता. २०) या समाजाचा जनआक्रोश मोर्चा च्या माध्यमातून आंदोलन करण्यात आले.
या मोर्चात सत्ताधारी पक्षाचे आमदार, विविध पदाधिकारी यांच्यासह विविध सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक संघटनांचे प्रमुख पदाधिकारी यांच्यासह लाखो नागरिक उपस्थित होते.

सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाच्या वर्गीकरणासंदर्भात दिलेल्या निर्णयानंतर तेलंगणा सरकारने यासाठीची अंमलबजावणी सुरू केली, त्यानंतर कर्नाटक सरकारही ही अंमलबजावणी करीत आहे, मात्र यात महाराष्ट्र सरकारने कोणत्याच हालचाली सुरू केल्या नसल्याने यासाठी सरकारला जाग आणण्यासाठी हा जनआक्रोश मोर्चा आज हे आंदोलन मुंबई आझाद मैदान येथे घेण्यात आले असून पहिल्यापासून मातंग समाज हा महायुती सोबत राहिलेला आहे असे आमदार अमित गोरखे म्हणाले ..

यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर जी बावनकुळे साहेब म्हणाले की मातंग समाजाची आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची मागणी लवकरच पूर्ण करण्यासाठी येणाऱ्या 15 दिवसात सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात येईल व महसूल मंत्री म्हणून व पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून सर्वस्वी जबाबदारी मी घेतो असे आश्वासन प्रसंगी दिले

यावेळी सकल मातंग समाजातर्फे आरक्षणाचे वर्गीकरण करून मातंग आणि त्यातील उपजातींना शिक्षण, नोकरी आदींमध्ये आरक्षणाची तरतूद करावी, तसेच सध्या सुरू असलेल्या वैद्यकीय, तंत्रशिक्षण आदी सर्व प्रकारच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये मातंग समाजाला आरक्षणाच्या वर्गीकरणानुसार प्रवेश आणि सवलत देण्यात यावी. आंध्र प्रदेशात मादिगा समाजाच्या विकासासाठी राबविण्यात येत असलेले मॉडेल राज्याने स्वीकारावे आणि त्यासोबतच अनुसूचित जातीसाठी राखीव ठेवण्यात येत असलेल्या निधीच्या सुरक्षेसाठी तेलंगणाच्या धर्तीवर कायदा करावा, प्रमुख मागण्या करण्यात आल्या.

प्रसंगी आमदार अमित गोरखे, आमदार सुनील कांबळे आमदार जितेश अंतापुरकर, आमदार हेमंत ओगले, माजी मंत्री रमेश बागवे, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, माजी मंत्री दिलीप कांबळे, माजी आमदार अविनाश घाटे, माजी आमदार ससाणे, माजी आमदार सुधाकर भालेराव, माजी आमदार गुंडिले साहेब, माजी आमदार थोरात, माजी आमदार राजू आवळे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आनंदा गुंडले, विष्णू भाऊ कसबे, adv राम चव्हाण, मारुती वाडेकर, सुदाम धूपे, पंडित सूर्यवंशी, श्री मुखेडकर, आदी समाजाचे नेते उपस्थित होते.
1 लाख पेक्षा समाज आझाद मैदान येथे एकत्र आला होता. यावेळी प्रास्ताविक आमदार श्री अमित गोरखे यांनी केले तर आभार प्रदर्शन मारुती वाडेकर यांनी केले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सकल मातंग समाजाचे आक्रोश महाआंदोलन! अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण जून २०२५ पासून लागू करण्याची मातंग समाजाची मोठी मागणी… – आमदार अमित गोरखे

सकल मातंग समाजाचे आक्रोश महाआंदोलन! अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण जून २०२५ पासून लागू करण्याची मातंग...

17 गोवंशीय जनावरांची सुटका ; अहिल्यानगर एलसीबी ची कारवाई…!

17 गोवंशीय जनावरांची सुटका ; अहिल्यानगर एलसीबी ची कारवाई...! महासत्ता भारत / अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश...

बुद्ध पौर्णिमेनिमित्त निलक्रांती चौक मित्र मंडळातर्फे थंडगार शितपेय आणि सरबताचे वाटप..

बुद्ध पौर्णिमेनिमित्त निलक्रांती चौक मित्र मंडळातर्फे थंडगार शितपेय आणि सरबताचे वाटप.. दरवर्षीप्रमाणे निलक्रांती चौक मित्र...