लेटेस्ट न्यूज़सापडलेलं गुप्तधन मिळावं, यासाठी जमीन मालकाची न्यायालयात धाव...!

सापडलेलं गुप्तधन मिळावं, यासाठी जमीन मालकाची न्यायालयात धाव…!

spot_img

श्रीरामपूर तालुक्यातल्या बेलापूर इथं राहणारे हरिनारायण प्रेमसुख खटोड यांच्या घराचं खोदकाम सुरु असताना एका पितळी हंड्यात 1 हजार 020 नाणी असं गुप्तधन सापडलं होतं. खटोड यांच्या म्हणण्यानुसार सदरचं गुप्तधन वडिलोपार्जित असून ते आपल्यालाच मिळावं. दरम्यान, यासाठी त्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे.

या संदर्भात खंडपीठाचे न्यायमूर्ती रविंद्र घुगे आणि न्यायमूर्ती आर. एम. जोशी यांच्यावर सुनावणी झाली. हे गुप्तधन पुरातत्व विभागाच्या ताब्यात देण्यात आलं असून पुढील सुनावणी दिनांक ७ मे रोजी होणार आहे. या सुनावणीच्या वेळी पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

या गुप्तधनासंदर्भात श्रीरामपूरचे तहसीलदार आणि नगरचे जिल्हाधिकारी यांना माहिती देण्यात आली. त्यानंतर दोन पंचनामे करण्यात आले. मात्र या दोन पंचनाम्यात तफावत असल्याचा मुद्दा त्यावेळी उपस्थित करण्यात आला होता.

हे गुप्तधन मूळ मालकाला परत देण्याची काय प्रक्रिया आहे, या संदर्भात पुरातत्त्व विभागानं शपथपत्र सादर करावं, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या सुनावणीकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास अहिल्यानगर - राजा शिवछत्रपती परिवार व स्नेहबंध सोशल...

एक लाखाची लाच घेताना पोलीस अधिकारी, शिपाई जाळ्यात

ठाणे/ मिरा रोड : नयानगर पोलीस ठाण्यात तक्रारदार यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यात त्यांना मदत...