राजकारणसाधू हत्याकांडाचा बदला घेण्यास हिंदू समाज सज्ज.. नितेश राणे यांचा...

साधू हत्याकांडाचा बदला घेण्यास हिंदू समाज सज्ज.. नितेश राणे यांचा विश्वास; मोदींच्या विचाराचा खासदार निवडून दिला तर विकासाची हमी!

spot_img

पालघरः पालघर जिल्ह्यात झालेल्या दोन साधूंच्या हत्याकांड प्रकरणामुळे हिंदू समाज प्रचंड चिडला आहे. पालघर लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने हिंदू समाजाला आता या हत्याकांडाचा बदला घेऊन भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉ. हेमंत सावरा यांना निवडून देण्याची चांगली संधी आहे, असे मत आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केले.

पत्रकारांशी बोलताना त्यांनी गेल्या अडीच वर्षांपूर्वी झालेल्या पालघरमधील साधू हत्याकांडाचा वारंवार उल्लेख केला आणि हिंदू समाज या हत्याकांडामुळे प्रक्षुद्ध झाला आहे, तो या निवडणुकीत निश्चित साधूच्या हत्याकांडाचा बदला घेईल, अशी खात्री त्यांनी या वेळी व्यक्त केली.

भाजपचा खासदार निवडून आला, तरच विकास
पालघर लोकसभा मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारसरणीचा खासदार निवडून आला तरच पालघरचे सर्व प्रश्न मार्गी लावण्याची हमी आपण घेत आहोत, असे राणे यांनी सांगितले; पण जर दुसऱ्या विचाराचा माणूस खासदार झाला, तर हिंदुत्व धोक्यात येईल आणि विकासासाठी इतरांपुढे हात पसरावे लागतील, असा गर्भित इशारा त्यांनी दिला.

तर घरोघरी श्रद्धा वालकर प्रकरणे वाढवण बंदरासह अन्य प्रश्नावर इथल्या जनतेची जी भूमिका आहे, तीच आमची ही भूमिका असेल असे सांगून ते म्हणाले, की देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखा भक्कम आणि खमका पंतप्रधान तसेच त्यांच्याच विचाराचा खासदार येथे झाला पाहिजे, जर देशात दुसऱ्या विचाराचे सरकार आणि दुसऱ्या विचाराचा खासदार झाला, तर श्रद्धा वालकरसारखी प्रकरणे घरोघरी होतील, असा इशारा राणे यांनी दिला. हे होऊ द्यायचे नसेल, तर पालघर लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे डॉ. सावरा यांना विजयी करा असे आवाहन त्यांनी केले.

कर्नाटक होऊ द्यायचे नसेल, तर.. काँग्रेसच्या नेत्यांनी रामाच्या जन्माबाबतच शंका घेतली होती. काँग्रेसचे प्रदेशाथ्यक्ष नाना पटोले हे गद्दार आहेत. त्यांचे धर्मांतर कधी झाले, ते त्यांचे त्यांनाही कळले नाही, अशी टीका करून राणे म्हणाले, की काँग्रेस मुस्लिम लीगसारखी झाली आहे. कर्नाटकात हिंदूंचे सण साजरे होऊ दिले जात नाही. तिथे टिपू सुलतानाची जयंती साजरी केली जाते. रामनवमी, हनुमान जयंती आदी उत्सव मोकळेपणाने, उत्साहात साजरे करायचे असतील, तर डॉ. सावरा यांना विजयी करा, पालघरचे कर्नाटक होऊ द्यायचे असेल, तर मग महाविकास आघाडी, ‘इंडिया’ आघाडीचा उमेदवार निवडून द्या आणि परिणामाला तयार राहा, असा इशारा राणे यांनी दिला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने त्या ठिकाणी पुनर्वसन करून देण्याची मागणी.

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने...

कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या कामगारांना कंत्राटदाराने नुकसान भरपाई देण्याचे मा.कामगार न्यायालयाचे आदेश..! मावळा प्रतिष्ठानचे श्री.निलेश म्हसे पा.यांनी केला पाठपुरावा…

अहिल्यानगर महानगर पालिकेच्या कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या चार कंत्राटी कामगारांना कंत्राटदाराने प्रत्येकी...

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव!

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव! अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यातील शिक्षण विभागात...

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प:

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प: सावेडीतील...