गुन्हेगारीसातबारा उताऱ्यावर खाडाखोड करुन 15 गुंठे जमीन स्वतःच्या नावावर लावत मारला ताबा...

सातबारा उताऱ्यावर खाडाखोड करुन 15 गुंठे जमीन स्वतःच्या नावावर लावत मारला ताबा ; ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे कार्यकर्ते सुधीर भद्रे यांच्याविरुद्ध तक्रार ; पिडितांनी घेतली आयजी बी. जी. शेखर पाटील यांची भेट…!

spot_img

नगर तालुक्यातल्या चिचोंडी पाटील इथं राहणाऱ्या कौसाबाई मारुती सरोदे यांच्या वडिलोपार्जित असलेल्या एक हेक्टर 99 आर. या जमिनीच्या सात बारा उताऱ्यावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे कार्यकर्ते सुधीर भद्रे यांनी खाडाखोड करुन 15.10 गुंठे जमीन स्वतःच्या नावावर लावून घेतली आणि कोविड काळातल्या लॉक डाऊनचा गैरफायदा घेत राहते घर पाडून त्या जागेवर दगडी कंपाउंड तयार करत गट नंबर 1028 मधील शासकीय भूमी अभिलेख यांच्याकडून मोजणी झालेल्या जमिनीच्या हद्दी,  खुणा असलेल्या क्षेत्रातदेखील 15 गुंठ्यात भद्रे यांनी बेकायदेशीर ताबा मारला, असा आरोप करत बैठकीसाठी नगरला आलेले नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील यांची पिडितांनी भेट घेऊन याप्रकरणी त्यांना निवेदन दिलं.

या संदर्भात माहिती घेऊन रितसर गुन्हा दाखल करा, असे आदेश आयजी बी. जी. शेखर पाटील यांनी नगरच्या पोलिसांना दिले. अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यावेळी उपस्थित होते.

दरम्यान, नगर जामखेड रस्त्यालगतच्या पाठीमागील बाजूला सुधीर राजाराम भद्रे, दिलीप रामभाऊ कोकाटे, अशोक रामदास कोकाटे यांनी पेट्रोल ओतून घराला आग लावून दिली, असा आरोप राजू नाथा कोळी, रेश्मा राजू कोळी यांनी केला आहे. या संदर्भातदेखील एक निवेदन पोलीस प्रशासनाला देण्यात आलं. यापूर्वी देखील भद्रे आणि गावातल्या काही गावगुंडांनी जागा बळकावण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेतली नाही, असा आरोप यावेळी करण्यात आला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने त्या ठिकाणी पुनर्वसन करून देण्याची मागणी.

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने...

कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या कामगारांना कंत्राटदाराने नुकसान भरपाई देण्याचे मा.कामगार न्यायालयाचे आदेश..! मावळा प्रतिष्ठानचे श्री.निलेश म्हसे पा.यांनी केला पाठपुरावा…

अहिल्यानगर महानगर पालिकेच्या कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या चार कंत्राटी कामगारांना कंत्राटदाराने प्रत्येकी...

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव!

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव! अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यातील शिक्षण विभागात...

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प:

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प: सावेडीतील...