अँन्टी करप्शनसाठ लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने, सव्वा लाखांची रोख रक्कम आणि एक कोटी 75...

साठ लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने, सव्वा लाखांची रोख रक्कम आणि एक कोटी 75 लाखांच्या मालमत्तेची कागदपत्रं एलसीबी पीआयच्या घरातून केली जप्त ; कुठं झाली कारवाई, घ्या जाणून…!

spot_img

पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यात प्रतिबंधात्मक कारवाई न करण्यासाठी दीड लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आलेल्या बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेचे लाचखोर पोलीस निरीक्षक दत्तात्रय सखाराम शिंदे याच्या घरात साठ लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने, सव्वा लाखांची रोख रक्कम आणि एक कोटी 75 लाखांच्या मालमत्तेची कागदपत्रं असं मोठ्ठं घबाड पोलिसांनी जप्त केलंय. दरम्यान न्यायालयानं पी. आय. शिंदे आणि इतर दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पी. आय. दत्तात्रय शिंदेसह हवालदार नितीन आनंदराव मोहने, अशोक साहेबराव पाटील (दोघं राहणार देवपूर, धुळे) अशी पकडण्यात आलेल्या संशयित लासखोर पोलिसांची नाव आहेत.

पी.आय. शिंदेच्या घरात काय काय सापडलंय…?

59 लाख रुपयांची 900 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने.

दहा लाख रुपयांचे चांदीचे दागिने.

एक लाख 26 हजार रुपयांची रोख रक्कम.

स्वतःसह पत्नी आणि इतर नातलगांच्या नावावर असलेली एक कोटी 75 लाख रुपयांच्या मालमत्तेची कागदपत्रं.

‘अशी’ आहे घटना…!

तक्रारदारांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई अंतर्गत गुन्हा दाखल न करण्यासाठी पीआय शिंदे यांच्या सांगण्यावरुन इतर दोघांनी दोन लाख रुपयांची लाच मागितली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नंतर या विभागानं सापळा रचला. संशयितांनी पंचांसमोर दीड लाख रुपयांची लाच स्विकारली. पंचांनी त्यांना रंगेहाथ पकडलं. या प्रकरणी दोंडाईचा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने त्या ठिकाणी पुनर्वसन करून देण्याची मागणी.

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने...

कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या कामगारांना कंत्राटदाराने नुकसान भरपाई देण्याचे मा.कामगार न्यायालयाचे आदेश..! मावळा प्रतिष्ठानचे श्री.निलेश म्हसे पा.यांनी केला पाठपुरावा…

अहिल्यानगर महानगर पालिकेच्या कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या चार कंत्राटी कामगारांना कंत्राटदाराने प्रत्येकी...

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव!

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव! अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यातील शिक्षण विभागात...

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प:

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प: सावेडीतील...