राजकारणसांबरे यांच्यामुळे दोन मतदारसंघाची समीकरणे बदलणार... काँग्रेसला भिवंडी न सोडल्याने...

सांबरे यांच्यामुळे दोन मतदारसंघाची समीकरणे बदलणार… काँग्रेसला भिवंडी न सोडल्याने महाविकास आघाडी अडचणीत; भिवंडीतून सांबरे स्वबळावर लढण्याची शक्यता!

spot_img

पालघरः भिवंडी लोकसभा मतदारसंघावरचा दावा अजूनही काँग्रेसने सोडलेला नसला, तरी आता या मतदारसंघात जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष नीलेश सांबरे यांना काँग्रेसची उमेदवारी मिळणे जवळपास अशक्य आहे. त्यामुळे आता पालघर आणि भिवंडी या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.

भिवंडी लोकसभा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला राहील असे चित्र होते; परंतु राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने या मतदारसंघातून बाळ्या मामा उर्फ सुरेश म्हात्रे यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेनेच्या शिंदे गटातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणून त्यांना उमेदवारी दिल्याने आता भिवंडी लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला मिळण्याची शक्यता नाही.

काँग्रेसचे दबावाचे राजकारण सांबरे यांच्यासाठी नाही
काँग्रेसच्या नेत्यांनी दबावाचे राजकारण सुरू केले असले आणि सामूहिक राजीनाम्याचे अस्त्र उगारले असले, तरी आता भिवंडी लोकसभा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला जाण्याची शक्यता दिसत नाही त्यामुळे मैत्रीपूर्ण लढत आणि बंड यापैकी एक पर्याय काँग्रेस करण्याची शक्यता आहे. त्यातही काँग्रेसकडून आता सध्या जी नावे पुढे येत आहेत, त्यात सांबरे यांचे नाव कुठेही नाही. त्यामुळे आता सांबरे यांना लोकसभा निवडणूक अपक्ष लढवावी लागण्याची शक्यता आहे.

भिवंडीचा फटका पालघरमध्ये
सांबरे यांना भिवंडीतून अपक्ष लढावे लागले, तर ते पालघर लोकसभा मतदारसंघातूनही जिजाऊ संघटनेचा उमेदवार उभे करण्याची शक्यता आहे. सांबरे यांच्यामुळे आता भिवंडी आणि पालघर या दोन्ही लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीची अडचण वाढणार आहे. सांबरे यांना काँग्रेसने भिवंडी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली असती, तर पालघर लोकसभा मतदारसंघात त्यांच्या जिजाऊ संघटनेने महाविकास आघाडीच्या उमेदवार भारती कामडी यांचे काम केले असते. त्यांच्या मागे आपली ताकद उभी केली असती; परंतु आता सांबरे भिवंडी आणि पालघर बाबत घेणार असलेल्या निर्णयामुळे मत विभागणी होण्याची शक्यता आहे. त्याचा फटका महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांना बसण्याची दाट शक्यता आहे.

मैत्रीपूर्ण लढतीत पुरस्कृत करण्याचा पर्याय
या पार्श्वभूमीवर आता महाविकास आघाडी सांबरे यांची समजूत कशी काढणार आणि त्यांचे राजकीय पुनर्वसन करणार की काँग्रेस त्यांना पालघरमधून पुरस्कृत करणार हा प्रश्न आहे. भिवंडीमधून काँग्रेसने त्यांना पुरस्कृत केले, तर ते महाविकास आघाडीच्या पालघरच्या उमेदवाराला मदत करणार का या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही. काँग्रेसच्या वरिष्ठांनी दबाव आणला आणि काँग्रेसजणांना उमेदवारी दाखल करून दिली नाही, तर सांबरे यांना पडद्यामागून मदत करण्याचा पर्याय काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने त्या ठिकाणी पुनर्वसन करून देण्याची मागणी.

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने...

कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या कामगारांना कंत्राटदाराने नुकसान भरपाई देण्याचे मा.कामगार न्यायालयाचे आदेश..! मावळा प्रतिष्ठानचे श्री.निलेश म्हसे पा.यांनी केला पाठपुरावा…

अहिल्यानगर महानगर पालिकेच्या कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या चार कंत्राटी कामगारांना कंत्राटदाराने प्रत्येकी...

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव!

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव! अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यातील शिक्षण विभागात...

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प:

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प: सावेडीतील...