गुन्हेगारीसराईत आरोपी पिन्या कापसेचे 02 साथीदार जेरबंद, अहमदनगर स्थानिक गुन्हेची कारवाई

सराईत आरोपी पिन्या कापसेचे 02 साथीदार जेरबंद, अहमदनगर स्थानिक गुन्हेची कारवाई

spot_img

दिनांक 03/03/2024 रोजी फिर्यादी राजेश गणेश राठोड (वय 28 वर्षे, रा. बजरंगनगर, पो. बान्सी, ता. पुसद, जि. यवतमाळ) तसेच त्याचे इतर 04 साथीदार यांनी मागील भांडणाच्या   कारणावरुन (पिन्या उर्फ सुरेश भारत कापसे रा. आंतरवली, ता. शेवगांव) याचे पिस्टलमधून फायर केला. परंतू त्यास गोळी लागली नाही. त्यावेळी पिन्या कापसे याने त्याचे 7 ते 8 साथीदारांसह फिर्यादी व साक्षीदार यांचा स्कॉर्पिओ गाडीने पाठलाग करुन त्यांना लाकडी लांडके, लोखंडी रॉड, दगडाने मारहाण केली होती.

सदर गुन्ह्यामध्ये जखमी नामे अर्जून पवार हा औषधोपचारादरम्यान मयत झालेला आहे. सदर घटनेबाबत शेवगांव पोलीस ठाणे गु.र.नं. 191/2024 भादवि कलम 302, 307 वगैरे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेवून आरोपींना अटक करणेबाबत राकेश ओला (पोलीस अधीक्षक अहमदनगर) यांनी पोनि दिनेश आहेर (स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर) यांना आदेश दिले होते.

सदर आदेशानुसार पोनि आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार मनोहर गोसावी, गणेश भिंगारदे, फुरकान शेख, संतोष खैरे, शिवाजी ढाकणे, जालिंदर माने, चापोकॉ अरुण मोरे यांचे पथक तयार करुन आरोपींची माहिती काढून आरोपींना ताब्यात घेणेबाबत पथकास सुचना देवून रवाना केले होते.

वरील पोलीस पथक दिनांक 09/03/2024 रोजी शेवगांव या ठिकाणी जावुन आरोपीची माहिती काढत असतांना मा. पोनि आहेर यांना सदर गुन्ह्यातील आरोपी नामे नितीन पन्हाळे व आबासाहेब कातकडे (दोन्ही रा. शेवगांव हे शेवगांव) या ठिकाणी आले असल्याची माहिती मिळाल्याने सदर प्राप्त माहिती पथकास कळवून आरोपीस ताब्यात घेणेबाबत सुचना दिल्या.

या पथकानं शेवगांव या ठिकाणी आरोपीची माहिती घेत असतांना दोन इसम शिवाजी चौक, शेवगांव येथे मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेवून त्यांना त्यांचे नांव गांव विचारता त्यांनी त्यांची नावे 1) नितीन उर्फ बंटी रमेश पन्हाळे (वय 37 वर्षे, रा. भगतसिंग चौक, शेवगांव, जि. अहमदनगर), 2) आबासाहेब नवनाथ कातकडे (वय 36 वर्षे, रा. ठाकुर निमगांव, ता. शेवगांव) असे असल्याचे सांगितले.

त्यांच्याकडे सदर गुन्ह्याबाबत विचारपुस करता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे सांगितल्याने त्यास पुढील तपासकामी शेवगांव पोलीस ठाणे गु.र.नं. 191/2024 भादवि कलम 302, 307 प्रमाणे या गुन्ह्याचे तपासकामी शेवगांव पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले असुन पुढील तपास शेवगांव पोलीस स्टेशन करीत आहेत. आरोपी नामे नितीन उर्फ बंटी रमेश पन्हाळे हा रेकॉर्डवरील आरोपी असून त्याच्याविरुध्द दरोडा, जबरी चोरी, घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.

सदरची कारवाई राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, प्रशांत खैरे, अपर पोलीस अधिक्षक, अहमदनगर व सुनिल पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी, शेवगांव उपविभाग यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने त्या ठिकाणी पुनर्वसन करून देण्याची मागणी.

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने...

कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या कामगारांना कंत्राटदाराने नुकसान भरपाई देण्याचे मा.कामगार न्यायालयाचे आदेश..! मावळा प्रतिष्ठानचे श्री.निलेश म्हसे पा.यांनी केला पाठपुरावा…

अहिल्यानगर महानगर पालिकेच्या कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या चार कंत्राटी कामगारांना कंत्राटदाराने प्रत्येकी...

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव!

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव! अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यातील शिक्षण विभागात...

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प:

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प: सावेडीतील...