सकल मातंग समाजाचे आक्रोश महाआंदोलन!
अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण जून २०२५ पासून लागू करण्याची मातंग समाजाची मोठी मागणी… – आमदार अमित गोरखे
अनुसूचित जातींमधील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या दुर्बल घटकांना न्याय मिळावा यासाठी सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने “आक्रोश महाआंदोलन” आयोजित करण्यात आले आहे. हे आंदोलन २० मे २०२५ रोजी, मुंबईच्या आझाद मैदानात दुपारी १ ला होणार आहे.
या आंदोलनाचा मुख्य उद्देश म्हणजे अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करून ते येत्या जून २०२५ पासून लागू करवे. उपवर्गीकरणामुळे अनुसूचित जातींमधील दुर्लक्षित घटकांना शैक्षणिक संधी, शासकीय नोकरी व योजनांचा थेट लाभ मिळू शकेल.
तरी “राज्य शासनाच्या विविध योजनांपासून आणि आरक्षणाच्या थेट लाभापासून अनेक लहान लहान उपगट वंचित राहत आहेत. त्यामुळे हक्काचे आरक्षण सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी उपवर्गीकरण अत्यावश्यक झाले आहे अशी समाजाची मागणी आहे.
या आंदोलनात सर्व पक्षीय अनेक मान्यवर नेते व लोकप्रतिनिधी सहभागी होणार असून, उपस्थिती लावणाऱ्यांमध्ये खालील प्रमुख व्यक्तींचा समावेश आहे:
विधानपरिषदेचे आमदार अमित गोरखे, आमदार सुनील कांबळे, आमदार जितेश अंतापूरकर, माजी आमदार मधुकरराव घाटे, माजी आमदार नामदेव जयराम ससाणे, माजी मंत्री रमेश बागवे, माजी मंत्री दिलीप कांबळे, आण्णाभाऊ साठेंचे नातू सचिन साठे, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, परिमल कांबळे याशिवाय सुदाम धुपे, पंडित सूर्यवंशी , मारुती वाडेकर, अशोक लोखंडे, राम चव्हाण, मुखेडकर साहेब, संजय शेंडगे, राजाभाऊ सूर्यवंशी, बिपीन घोरपडे, सुखदेव अडागळे, युवराज दाखले, राजेंद्र अडागळे, राजूभाऊ अहिरे, प्रदीपभाऊ सरोदे, नितीन दिनकर, मंगेश त्रिभुवन, नामदेवराव चांदणे, भगवानराव गोरखे, काशिनाथ सुलाखे यांसारखे अनेक नेते आंदोलनात सहभागी होणार आहेत.
सरकारने लवकरात लवकर आरक्षणाचे उपवर्गीकरण करून न्याय द्यावा, अन्यथा आंदोलन अजूनतीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे येणार्या मंगळवारी आझाद मैदानावर आयोजित केलेल्या आंदोलन सहभागी होण्याचे आवाहन आमदार अमित गोरखे यांनी सर्व समाज बांधवाना केले आहे …