नगर – लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या नावाने दिला जाणारा शासनाचा पुरस्कार सुनील सकट, पोपटराव साठे ,पोपटराव पाथरे यांना मिळाल्याने शिवसेनेच्या वतीने त्यांचा सत्कार करून गौरव करण्यात आला यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबूशेठ टायरवाले व अनिल शिंदे, संपर्क प्रमुख सचिन जाधव ,उपजिल्हाप्रमुख आनंद शेळके, शहर प्रमुख दिलीप सातपुते आदी उपस्थित होते.
सामाजिक न्याय विभाग व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते सकट,साठे,पाथरे यांना राज्यस्तरीय साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे पुरस्कार मिळाला. यामुळे त्याचा सत्कार करण्यात आला होते.
पुरस्काराचे स्वरुप सन्मानचिन्ह,शाल श्रीफळ,२५,००० रुपये चा धनादेश, सन्मानपत्र असे आहे
फोटो- शासनाचा साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे पुरस्कार सुनील सकट, पोपटराव साठे ,पोपटराव पाथरे यांना मिळाल्याने शिवसेनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबूशेठ टायरवाले व अनिल शिंदे, संपर्क प्रमुख सचिन जाधव ,उपजिल्हाप्रमुख आनंद शेळके, शहर प्रमुख दिलीप सातपुते आदी मान्यवर उपस्थित होते.