लेटेस्ट न्यूज़संभाजी ब्रिगेडच्या वतीने औद्योगिक विकास महामंडळचे राज्याचे प्रधान सचिव डॉ. अन्बलगन यांना...
संभाजी ब्रिगेडच्या वतीने औद्योगिक विकास महामंडळचे राज्याचे प्रधान सचिव डॉ. अन्बलगन यांना निवेदन; भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशीची मागणी केल्यामुळे मनात राग धरून खोटा खंडणीचा गुन्हा दाखल…!
संभाजी ब्रिगेडच्या वतीने औद्योगिक विकास महामंडळचे राज्याचे प्रधान सचिव डॉ. अन्बलगन यांना निवेदन;
नगर एमआयडीसी च्या उपअभियंता व कार्यकारी अभियंता यांनी ठेकेदाराला हाताशी धरून संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ कराळे यांच्यावर खोटा खंडणीचा गुन्हा दाखल केला असल्याचा आरोप…
भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशीची मागणी केल्यामुळे मनात राग धरून खोटा खंडणीचा गुन्हा दाखल…!
नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर येथील एमआयडीसी च्या उपअभियंता संदीप बडगे व कार्यकारी अभियंता कोतवाड यांनी २२ ऑक्टोबर २०२४ रोजी बी पी सी एल च्या ठेकेदाराला हाताशी धरून संभाजी ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष सोमनाथ गंगाधर कराळे पाटील यांच्यावर खोटा खंडणीचा गुन्हा दाखल केला असून २३ ऑक्टोबर २०२४ रोजी कराळे यांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे सदर गुन्ह्याबाबत झालेली घटनाक्रम तसेच माझ्या व ड्रायव्हरचा सीडीआर रिपोर्ट मागवलेला आहे. व पोलीस महासंचालक यांना देखील निवेदन देऊन सदर गुन्हा खरा किंवा खोटा याबाबत पडताळणी करावी व उपअभियंता संदीप बडगे व कार्यकारी अभियंता कोतवाड यांच्या गैरकारभार लपवण्यासाठी हा सगळा बनव तयार करून मुख्य कार्यकारी अधिकारी व अभियंता वानखेडे तसेच चव्हाण यांना चुकीची माहिती देण्यात येत आहे. संदीप बडगे व त्यांच्या कुटुंबीयांच्या नावे बेनामी संपत्ती जमवलेली आहे.
तसेच उपअभियंता संदीप बडगे यांनी केलेल्या चुकीच्या कामासंदर्भात संभाजी ब्रिगेडच्या वतीने आम्ही आवाज उठवला त्यामुळे मनात राग धरून खोटा नाटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर प्रकरणाची सकोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी तसेच बडगे यांनी अनेक ठेक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा केलेला आहे. हा उघडकीस आणण्यासाठी आमचा प्रयत्न असून ते दाबण्यासाठी आमच्यावर खोटे नाटे गुन्हे दाखल करत आहे.
त्यामुळे उपअभियंता याची कार्यालयीन व त्रिपक्षीय चौकशी करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली असून योग्य ती कारवाई करून फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष सोमनाथ गंगाधर कराळे पाटील यांनी निवेदनाद्वारे केली आहे.