संभाजीनगर मधील धर्मदाय आयुक्त कार्यालयातील निरीक्षकास दहा हजाराची लाच घेताना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले..!
यशस्वी सापळा कारवाई अहवाल
दि.12/03/2024
▶️ युनिट- छत्रपती संभाजीनगर
▶️ तक्रारदार- पुरुष, वय- 53 वर्ष,रा. चाळीसगाव
▶️ आरोपी – श्री दीप दौलतराव बागूल , वय-39वर्ष, व्यवसाय-नोकरी पद-निरीक्षक धर्मदाय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजी नगर रा.प्लॅट न. 103 रामगोपाल नगर श्रीराम पार्क , छत्रपती संभाजीनगर वर्ग – 3
➡️लाच मागणी दिनांक 11/3/2024
▶️ लाच मागणी 10,000/-रुपये स्विकारण्याचे मान्य केले
➡️ लाच स्विकारली दि – 12/3/2024
➡️ लाच स्विकारली रक्कम – 10,000/-रुपये
▶️ ठिकाण- कालीमठ फाटा ता. कन्नड जि.छत्रपती संभाजीनगर
▶️ कारण – तक्रारदार यांचे कालीमठ ट्रस्ट (उपळा) येथील गुप्त दान पेटी उघडून त्यातील दान रकमेचा हिशोब करुन सदरची रक्कम ट्रस्टी चे ताब्यात देण्यासाठी केलेल्या कामाचा मोबदला म्हणून 10,000/दहा हजार रुपये पंचासमक्ष तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी करून 10,000/- स्विकारण्याचे मान्य केले. कालीमठ फाटा येथे पंचासमक्ष तक्रारदार यांचेकडून लाचेची रक्कम 10,000/-रुपये स्वतः स्वीकारले नंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले असून पोलीस स्टेशन कन्नड ग्रामीण येथे गुन्हा दाखल करणेची प्रक्रिया सुरु आहे.
▶️ सापळा अधिकारी गोरखनाथ गांगुर्डे ,
पोलीस उप अधीक्षक ला.प्र.वि.
▶️मार्गदर्शक- मा. संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.
मा .श्री.मुकुंद अघाव , अपर पोलिस अधीक्षक ला.प्र.वि.
श्री राजीव तळेकर पोलीस उपाधीक्षक
➡️सापळा पथक – पोलीस हवालदार, दिगंबर पाठक, भीमराज जिवडे ,राजेंद्र सिनकर चालक /चंद्रकांत शिंदे ला. प्र. वि. छत्रपती संभाजीनगर