राजकारणश्रीगोंदे तालुका खादी ग्रामोद्योग संघाचे संचालक धनंजय लोखंडे यांची बहुजन रयत परिषदेच्या...

श्रीगोंदे तालुका खादी ग्रामोद्योग संघाचे संचालक धनंजय लोखंडे यांची बहुजन रयत परिषदेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

spot_img

अंकुश शिंदे/ श्रीगोंदे:- श्रीगोंदे तालुका खादी ग्राम उद्योग संघाचे संचालक धनंजय लोखंडे यांची नुकतेच बहुजन रयत परिषदेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाली या निवडीचे पत्र बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्ष ॲड.कोमल साळुंखे यांनी पुणे येथे दिले. श्रीगोंदे तालुक्यातील मांडवगण येथील सामाजिक कार्यकर्ते व श्रीगोंदे तालुका खादी ग्रामोद्योग संघाचे संचालक धनंजय लोखंडे यांची बहुजन रयत परिषदेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

पुणे येथे बहुजन परिषदेच्या मुख्य कार्यालय भोसरी या ठिकाणी बैठक आयोजित केली होती . या बैठकीचे प्रमुख बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्ष ॲड .कोमल साळुंखे होत्या . तसेच प्रदेश उपाध्यक्ष प्राध्यापक नाम साठे बहुजन रयत परिषदेचे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष प्राध्यापक बापूसाहेब गायकवाड जिल्हा सचिव संतोष साळवे , जिल्हा युवक अध्यक्ष रवींद्र कंगरे विशाल ससाने हे प्रमुख मान्यवर या बैठकीस उपस्थित होते.

यावेळी कोमल ताई साळुंखे यांनी सांगितले की राज्यात बहुजन रयत परिषदेचा विस्तार मोठ्या प्रमाणात वाढवायचा असल्याने या संघटनेमध्ये राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात नवनवीन युवकांना संधी देण्याचे काम करत आहोत म्हणूनच अहमदनगर जिल्ह्यातील जिल्हा उपाध्यक्ष म्हणून श्रीगोंदे तालुक्यातील मांडवगण येथील युवक कार्यकर्ता व खादी ग्राम उद्योग चे विद्यमान संचालक धनंजय लोखंडे यांची निवड करण्यात आली.

धनंजय लोखंडे यांची निवड होताच बहुजन समता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष वसंतराव सकट, श्रीगोंदे खादी ग्राम उद्योग संघाचे व्हाईस चेअरमन बबन शेठ श्रीराम , महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष अंकुश शिंदे , सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर लखन लोखंडे , काष्टी येथील युवक कार्यकर्ते राहुल पवार , भाऊ तोरडमल, मयूर गोरखे , प्रवीण साबळे यांनी अभिनंदन केले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास अहिल्यानगर - राजा शिवछत्रपती परिवार व स्नेहबंध सोशल...

एक लाखाची लाच घेताना पोलीस अधिकारी, शिपाई जाळ्यात

ठाणे/ मिरा रोड : नयानगर पोलीस ठाण्यात तक्रारदार यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यात त्यांना मदत...