गुन्हेगारीशेवगाव येथे ४ लाखांची सुगंधी तंबाखू जप्त-६ जणांविरोधात गुन्हा दाखल- ३ आरोपींना...

शेवगाव येथे ४ लाखांची सुगंधी तंबाखू जप्त-६ जणांविरोधात गुन्हा दाखल- ३ आरोपींना घेतले ताब्यात- अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

spot_img

शेवगाव येथे ४ लाखांची सुगंधी तंबाखू जप्त-६ जणांविरोधात गुन्हा दाखल- ३ आरोपींना घेतले ताब्यात- अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

नगर: ता.६:- शेवगाव येथे अवैधरित्या विकत घेऊन विक्रीसाठी ठेवलेला एक लाख ४ हजार ४२० रुपये किमतीचा विविध कंपनीचा सुगंधी पानमसाला- तंबाखू व गुटखा शेवगाव शहरातील खालची वेस येथे पकडला. अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवार (ता.६) दुपारी ही कारवाई केली.

याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस कॉन्स्टेबल शिवाजी अशोक ढाकणे यांच्या फिर्यादीवरून बिलाल मोहंमद हनिफ तांबोळी (वय ३४), अरबाज मोहंमद रफीक तांबोळी (वय २२), अजीम फारूक तांबोळी (वय ४१), (सर्व राहणार खालची वेस, काझी गल्ली, शेवगाव), अख्तर महेबूब आंबेकर (रा. ता. पैठण), दादासाहेब अंकुश जाधव, आदिनाथ अंकुश जाधव (दोघे, रा. ता. गेवराई) या सहा जणांविरोधात अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यातआला आहे. तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांना गुप्त बातमीदार मार्फत मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस हेड कॉन्स्टेबल संतोष लोंढे, पोलिस कॉन्स्टेबल किशोर शिरसाठ, पोलिस कॉन्स्टेबल आदिनाथ शिरसाठ, तसेच शेवगाव पोलिस ठाण्याच्या पोलिस कॉन्स्टेबल गीतांजली पाथरकर यांनी पंचासमक्ष शहरातील खालची वेस येथे राहणारे बिलाल, अरबाज व अजीम तांबोळी यांच्या घराची झडती घेतली असता तेथे १ लाख ४ हजार ४२० रुपयांचे विविध कंपन्यांचे ५७६ सुगंधी पानमसाला तंबाखू व गुटखा पुढे आढळून आले. त्यांच्याकडे विचारपूस केली असता सर्व पानमसाला अख्तर आंबेकर, दादासाहेब जाधव, आदिनाथ जाधव यांच्याकडून विक्रीसाठी घेतल्याचे सांगितले.

अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत गुन्हा नगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सदरची कारवाई ही राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेली सुगंधी पानमसाला तंबाखू व गुटखा विकत घेऊन विक्रीसाठी ठेवल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत व इतर कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे करीत आहेत

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सागर शिंदे यांची भाजपा युवा मोर्चा जिल्हा संयोजकपदी निवड

नगर-येथील शेंडी ग्रामपंचायतीचे सदस्य,शिवभक्त सागरभाऊ शिंदे यांची अहिल्यानगर दक्षिण भाजपा युवा मोर्चा जिल्हा संयोजक...

पाथर्डी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यासह ठेकेदाराविरुद्ध कठोर कारवाई करणार; राष्ट्रीय महामार्गाच्या उपविभागीय अभियंत्याचं उपोषणकर्त्यांना लेखी आश्वासन…!

पाथर्डी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यासह ठेकेदाराविरुद्ध कठोर कारवाई करणार; राष्ट्रीय महामार्गाच्या उपविभागीय अभियंत्याचं उपोषणकर्त्यांना लेखी आश्वासन...! महासत्ता...

मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचा रेकॉर्ड तपासला जाणार, छाननीत गडबड आढळल्यास 1500 रुपये बंद होणार..

मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचा रेकॉर्ड तपासला जाणार, छाननीत गडबड आढळल्यास 1500 रुपये...

दिव्यांग वधू व वर यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून समाधान मिळाले- लोकसेवक युवराज दाखले

दिव्यांग वधू व वर यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून समाधान मिळाले- लोकसेवक युवराज दाखले पिंपरी -प्रतिनिधी,...