शेवगाव – शेवगांव पोलीस स्टेशन हद्दीतील आखतवाडे ता. शेवगाव येथील १) संजय रंगनाथ उगले २) शुभम संजय उगले यांच्या मालकीची विहिरीमधील ५ एच पी ची व्हिनस कंपनीच्या दोन पानबुडी ईलेक्ट्रीक मोटर ह्या चोरीला गेल्याने शेवगाव पोलीस स्टेशन येथे संजय रंगनाथ उगले यांचे फिर्यादी वरुन गु.र.नं. २२१/२०२४ भादवि कलम ३७९ प्रमाने दिनांक १५/०३/२०२४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
वरिल गुन्ह्याचे अनुषंगाने मा. पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे सो यांनी तपासकामी पोलीस पथक तयार करुन तपासाबाबत सुचना दिल्या गोपणीय माहीतीच्या आधारे चोरीला गेलेल्या ईलेक्ट्रीक पानबुडी मोटर तसेच आरोर्षीचा शोध घेतला असता १) प्रकाश कल्याण साळवे, २) श्रृषीकेश लक्ष्मण साळवे, ३) कल्याण गुलाब साळवे सर्व रा. आखतवाडे ता. शेवगाव यांनी ईलेक्ट्रीक मोटर चोरी केलेबाबत माहीती मिळाल्याने पोलीस पथकाने आखतवाडे ता. शेवगाव येथे जावुन आरोर्षीचा शिताफीने शोध घेवुन आरोपी नामे १) प्रकाश कल्याण साळवे, २) श्रृषीकेश लक्ष्मण साळवे हे मिळुन आल्याने त्यांचेकडुन चोरीला गेलेली ईलेक्ट्रॉनिक पानबुडी मोटर हस्तगत करण्यात आली आहे.सदरची कारवाई ही मा. पोलीस अधिक्षक श्री राकेश ओला सो.अ.नगर, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री प्रशांत खैरे अ.नगर, मा. उपविभागिय पोलीस अधिकारी श्री सुनिल पाटील सो उपविभाग शेवगांव यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि.श्री दिगंबर भदाणे, सपोनि सुनिल बागुल, पोहेकॉ प्रशांत नाकाडे, पोना उमेश गायकवाड, पोकों शाम गुंजाळ, पोकॉ बप्पासाहेब धाकतोडे, पोकॉ एकनाथ गर्कळ, पोकों संतोष वाघ, पोकों कृष्णा मोरे यांनी केली असुन पुढील तपास पो.नि. श्री दिंगबर भदाणे यांचे मार्गदर्शनाखाली पोहेकाँ प्रशांत नाकाडे हे करत आहेत