लेटेस्ट न्यूज़शेवगाव पीआय दिगंबर भदाने साहेब ! पोलीस ठाण्याच्या हद्दीत नक्की चाललंय तरी...

शेवगाव पीआय दिगंबर भदाने साहेब ! पोलीस ठाण्याच्या हद्दीत नक्की चाललंय तरी काय? शेवगावचा ‘हर्षद मेहता’ कधी ‘एक्सपोज’ करताय ?

spot_img

शेवगावच्या पोलीस ठाण्यात पीआय दिगंबर भदाने जेव्हापासून रुजू झाले, तेव्हापासून शेवगावचा शेअर बाजार चांगलाच वधारलाय. तब्बल दीड हजार कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल शेअर बाजारच्या माध्यमातून एकट्या शेवगावमध्ये झाली आहे. विशेष म्हणजे ज्याच्याकडे ही आर्थिक उलाढाल झाली, त्याच्या नावाचा गैरवापर करून अनेकांनी शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतविल्यास 17 टक्के कमिशन देऊ, असं ‘गाजर’ दाखवत चाळीस कोटी रुपये घेऊन पोबारा केला आहे.

या सर्व चिंताजनक परिस्थितीकडे वरिष्ठांचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही शेवगावचे पी.आय. दिगंबर भदाणे यांना जाहीर सवाल करत आहोत, की शेवगाव पीआय दिगंबर भदाने साहेब, तुमच्या पोलीस ठाण्यात हद्दीत नक्की चाललंय तरी काय? अहो, शेवगावच्या ‘हर्षद मेहता’ला तुम्ही नक्की कधी ‘एक्सपोज’ करताय ? सर्वात संतापजनक माहिती अशी आहे, की दिनांक एक मार्चपासून आजपर्यंतच्या (दि.१५) कालावधीमध्ये तब्बल 19 जण बेपत्ता आहेत. त्यापैकी फक्त दोघांचाच तपास लावण्यात शेवगाव पोलिसांना यश आला आहे उर्वरित 17 जणांचे काय, असा गंभीर प्रश्न शेवगावकरांमधून उपस्थित केला जात आहे. या 19 जणांच्या बेपत्ता होण्याची कारणं कागदोपत्री वेगवेगळी दिली असली तरी शेअर बाजारात झालेल्या आर्थिक नुकसानीमुळेच हे सतरा जण बेपत्ता झाले आहेत, अशी शेवगावमध्ये दबक्या आवाजात चर्चा आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आपापसात वाद मिटविणे महत्वाचे: न्यायाधीश अंजू शेंडे…  राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन

आपापसात वाद मिटविणे महत्वाचे: न्यायाधीश अंजू शेंडे...  राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन अहिल्यानगर, ता. १०: प्रत्येकाला आपले हक्क...

मंत्री संजय शिरसाठ साहेब, मातंग समाजाच्या उद्धारासाठी काही तरी करा; लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचं अध्यक्ष नियुक्ती करा व बजेट वाढवा…!

मंत्री संजय शिरसाठ साहेब, मातंग समाजाच्या उद्धारासाठी काही तरी करा;  लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक...

शिर्डीतील १६ अवैध धंद्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई..!

स्थानिक गुन्हे शाखा अॅक्शन मोडमध्ये तब्बल 16 अवैध धंद्यांवर छापे दारू व जुगार अड्डे...