गुन्हेगारीशेअर मार्केट गुंतवणुकीच्या आमिषाने १.१० कोटींची फसवणूक; आंतरराष्ट्रीय टोळीतील आरोपींना सायबर पोलिसांची...

शेअर मार्केट गुंतवणुकीच्या आमिषाने १.१० कोटींची फसवणूक; आंतरराष्ट्रीय टोळीतील आरोपींना सायबर पोलिसांची बेड्या

spot_img

शेअर मार्केट गुंतवणुकीच्या आमिषाने १.१० कोटींची फसवणूक; आंतरराष्ट्रीय टोळीतील आरोपींना सायबर पोलिसांची बेड्या

अहिल्यानगर : शेअर मार्केटमध्ये मोठ्या परताव्याच्या आमिषाने गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीतील आरोपींना सायबर पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात १ कोटी १० लाख ८० हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले असून, भारतातील स्थानिक आरोपी परदेशातील गुन्हेगारांच्या मदतीने नागरिकांची फसवणूक करत असल्याचे समोर आले आहे.

फसवणुकीची व्याप्ती आणि पोलिसांचा तपास – २७ जानेवारी २०२५ रोजी फिर्यादीने सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती की, ऑक्टोबर २०२४ ते नोव्हेंबर २०२४ या कालावधीत SMC Global Securities नावाने व्हॉट्सअॅपवरून शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून २०-३० टक्के अधिक नफा मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आले. या भूलथापांना बळी पडून फिर्यादीने १ कोटी १० लाख ८० हजार रुपये गुंतवले, मात्र फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.

या प्रकरणाचा तपास करताना सायबर पोलिसांनी आर्थिक व्यवहारांचे तांत्रिक विश्लेषण केले. यातून मिळालेल्या बँक खात्यांच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी महावीर कांबळे (रा. गोटेवाडी, मोहोळ, सोलापूर) याला अटक केली. त्याच्या चौकशीतून आणखी तीन साथीदार – प्रविण लॉहे, शिवाजी साळुंके आणि सागर कुलकर्णी यांचा सहभाग उघड झाला.

या चौकशीतून राजेश राठोड उर्फ राजेंद्र भगीरथ सिंग (रा. बिंजारी राणीगाव, नागौर, राजस्थान) हा कंबोडियातील कंपन्यांशी संपर्क साधून पैसे वर्ग करून त्याचा हवालामार्फत परदेशात पाठवण्याचे काम करत असल्याचे समोर आले. त्याला १७ फेब्रुवारी २०२५ रोजी अटक करण्यात आली.

राजेंद्रच्या चौकशीतून फसवणुकीत चीनच्या नागरिकांचा सहभाग असल्याचे उघड झाले. या टोळीने भारतीय चलन परदेशी डिजिटल चलनामध्ये (USDT) रूपांतरित करून कंबोडियामध्ये पाठवले होते. त्याच्या सांगण्यावरून हवाला नेटवर्कद्वारे पैसे हस्तांतरित करणाऱ्या दीपककुमार जोशी (रा. वसंत विहार, सोलापूर, मुळ रा. पाटण, गुजरात) याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून १२.९२ लाख रुपये रोख, एक कार आणि तीन मोबाईल जप्त करण्यात आले.

नागरीकांना सायबर पोलिसांचे आवाहन- संपूर्ण प्रकरण उघडकीस आल्यानंतर सायबर पोलिसांनी नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. शेअर मार्केटमध्ये मोठ्या नफ्याच्या आमिषाला बळी न पडता योग्य तपासणी करूनच गुंतवणूक करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच आपले बँक खाते किंवा कागदपत्रे तृतीय पक्षाला देणे टाळावे, अन्यथा मोठ्या आर्थिक फसवणुकीला सामोरे जावे लागू शकते.

ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम, पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर पोलीस अंमलदार योगेश गोसावी, अभिजीत अरकल, राहुल हुसळे, अरुण सांगळे, मोहम्मंद शेख, यांनी केली आहे. त्यांच्या पथकाने केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मौजे- वडारवाडी गाव ते यशवंत नगर शहापूर-केकती गावाकडे जाणारा मुख्य रस्ता काँक्रिटीकरण करण्यात यावा

मौजे- वडारवाडी गाव ते यशवंत नगर शहापूर-केकती गावाकडे जाणारा मुख्य रस्ता काँक्रिटीकरण करण्यात यावा मौजे...

अनैतिक वापर झालेल्या, भंगार बसेसवरून ‘ शिवशाही ‘ हे नाव तातडीने हटवा..

अनैतिक वापर झालेल्या, भंगार बसेसवरून ' शिवशाही ' हे नाव तातडीने हटवा महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील...