नगर तालुक्यातल्या डोंगरगण फाट्याजवळून (चिमटा) अवघ्या सातशे मीटर अंतरावर असलेली डेरेदार झाडं कोणी तरी जाळून टाकली आहेत. अज्ञात हरामखोर व्यक्तीनं या झाडाच्या बुंध्यालाच आग लावली. त्यामुळे अनेक झाडं मृत्युमुखी पडली आहेत. निस्वार्थी भावनेनं सावली आणि शुद्ध हवा (ऑक्सिजन) झाड झाडून टाकताना संबंधितांना थोडीशी लाज वाटायला हवी. या भयानक परिस्थितीचे आता तुम्हीच पहा हे दोन व्हिडिओ…!
केंद्र आणि राज्य सरकार पर्यावरण वाचवण्यासाठी विविध योजना राबवतं. राज्याचा वनविभाग यासाठी अहोरात्र राबत असतो. मात्र या विभागाच्या डोळ्यात धुळ फेकून काही हलकट औलादीची माणसं बिनधास्तपणे अशी डेरेदार झाडं जाळून टाकत आहेत. अशा परिस्थितीत नगरचा वनविभाग आणखी किती दिवस झोपा काढणार, हाच खरा प्रश्न आहे.