राजकारणशिवपुत्र संभाजी महानाट्य आमदार राम शिंदेंकडून नीलेश लंकेंचे कौतुक

शिवपुत्र संभाजी महानाट्य आमदार राम शिंदेंकडून नीलेश लंकेंचे कौतुक

spot_img

नगर – आमदार नीलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिवपुत्र संभाजी महानाट्याच्या व्यासपीठावर भाजपचे माजी मंत्री तथा आमदार राम शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके ‘,बीआरएस’चे घनश्याम शेलार, ‘काँग्रेस’चे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळुके, प्रा.मधुकर राळेभात, गहिनीनाथ शिरसाट, दीपक भोसले, करण ससाने,प्रियाताई कदम,छायाताई फिरोदिया, प्राचार्य पोपट तांबे, बाळासाहेब उगले, बंडू पाटील बोरुडे, रोहिदास कर्डिले, डॉ सुदर्शन पोटे यांच्यासह इतर पक्षांच्या नेत्यांनी हजेरी लावली.केडगाव येथे शिवपुत्र संभाजी या महानाट्याचा दुसरा दिवस होता.

भाजपाचे माजी मंत्री राम शिंदे यांच्या हस्ते महानाट्याचा शुभारंभ करण्यात आला.
महानाट्याचा शुभारंभ करताना आ.राम शिंदे यांनी आमदार नीलेश लंके यांचे कौतुक केले.ते म्हणाले, आमदार लंके यांच्या पाठीशी जनता खंबीरपणे उभी आहे.त्यांचे कोविड काळातील काम कौतुकास्पद आहे.या कामामुळे त्यांचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचले.ज्याच्या पाठीशी जनता खंबीरपणे उभी असते,त्याला चिंता करण्याचे काही गरज नाही.

आमदार लंके यांच्या मनातील इच्छा साईबाबा पूर्ण करतील, असे सांगून भाजपाचे माजी आमदार चंद्रशेखर कदम म्हणाले, लंके यांना शुभेच्छा दिल्या. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके म्हणाले, माझी काय मदत असते, हे लंके यांना माहीत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लोकसभेच्या निवडणुकीत झालेली चूक अखंड समाजाने विधानसभेला भरून काढली… भाजपा आणि महायुतीच्या पारड्यात भरभरून मतदान – अमित गोरखे 

लोकसभेच्या निवडणुकीत झालेली चूक अखंड समाजाने विधानसभेला भरून काढली... भाजपा आणि महायुतीच्या पारड्यात भरभरून मतदान...

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास अहिल्यानगर - राजा शिवछत्रपती परिवार व स्नेहबंध सोशल...

एक लाखाची लाच घेताना पोलीस अधिकारी, शिपाई जाळ्यात

ठाणे/ मिरा रोड : नयानगर पोलीस ठाण्यात तक्रारदार यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यात त्यांना मदत...