राजकारणशिर्डी लोकसभा मतदारसंघात आजही आहेत ५० हजार ५२९ 'रावण समर्थक'?

शिर्डी लोकसभा मतदारसंघात आजही आहेत ५० हजार ५२९ ‘रावण समर्थक’?

spot_img

शिर्डी लोकसभा मतदारसंघात पराभूत झालेल्या सदाशिव लोखंडे यांनी त्यांच्या पराभवाची दिलेली कारण मिमांसा ऐकून त्यांना मतदान केलेल्या आणि त्यांना मतदान न केलेल्या अशा मतदारांची अवस्था ‘हसावं की रडावं’ अशी झाली आहे. लोखंडे यांना मतदान केलेल्या मतदारांवर तर अक्षरशः स्वतःचंच तोंड झोडून घ्यायची वेळ आली आहे.

लोकसभेच्या या निवडणुकीत लोखंडे यांना तब्बल ४ लाख २६ हजार ३७१ मतदारांनी मतं दिली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी भाऊसाहेब वाकचौरे यांना ४ लाख ७६ हजार ९०० इतकी मतं मिळाली आहेत.

आता या दोघांच्या मतांची वजाबाकी केली तर लोखंडे यांना ५० हजार ५२९ मतदारांनी मतं दिली नाहीत. म्हणजे शिर्डी मतदार संघात ५० हजार ५२९ एवढे सारे रावण आहेत, असं लोखंडेंना म्हणायचं का? काय तर म्हणे, माझ्या पराभवाला अयोध्येतलं राम मंदीर कारणीभूत आहे!

लोखंडेंच्या मतानुसार या मतदारसंघात रावणाला मानणारे बरेच आदिवासी असून त्यांना रामाचं मंदीर रुचलेलं नाही. व्वा लोखंडे साहेब व्वा! काय अजब तर्क लावलाय तुम्ही तुमच्या पराभवाचा? विखे आणि थोरात यांच्या राजकीय वादात बळी गेला, असं जर लोखंडे यांचं म्हणणं आहे तर ‘रावणाची पूजा करणारे’ असं म्हणत लोखंडे आदिवासींना का बदनाम करत आहेत ?

वास्तविक पाहता शिर्डी लोकसभा मतदारसंघात लोखंडे यांनी मतदार आणि कार्यकर्त्यांशी किती आणि कसा संपर्क ठेवला? केंद्राच्या किती योजना लोखंडे यांनी या मतदारसंघात यशस्वीपणे राबवल्या? केंद्र सरकारच्या मुद्रा लोन योजनेचा लोखंडे यांनी या मतदारसंघातल्या किती बेरोजगार तरुणांना लाभ मिळवून दिला? या मतदारसंघात लोखंडे यांनी किती नवे उद्योग आणले?

उचलली जीभ आणि लावली…!

लोखंडे यांनी त्यांच्या पराभवाची जी कारणं सांगितली आहेत, ती ऐकल्यानंतर त्यांना मतदान केलेल्या मतदारांच्या मनावर काय परिणाम झाला असेल याचा लोखंडे यांनी कसलाही विचार केला नाही. वास्तविक पाहता त्यांना मतं देण्यापूर्वी मतदारांनी ते पंतप्रधान नरेंद्र मोदींना मतं देत आहे, या भावनेतूनच मतं दिली आहेत. त्यामुळेच लोखंडे यांना ४ लाख २६ हजार ३७१ मतं मिळाली आणि समजा, लोखंडे निवडून आले असते तर त्यांनी त्यांच्या पराभवाचं श्रेय प्रभू रामचंद्रांना दिलं असतं का? काहीही म्हणा, लोखंडे यांचं हे विधान पूर्णपणे बेजबाबदारपणाचं असून ‘उचलली जीभ आणि लावली टाळ्याला’, अशा पध्दतीचं लोखंडे यांचं हे विधान आहे.

… तर मग लोखंडे यांनी विधानसभेची निवडणूक लढवून जिंकून दाखवावी…!

मतदार आणि कार्यकर्त्यांशी कुठलाही संपर्क ठेवायचा नाही. मतदारांनी दोन वेळा संधी देऊनही त्या संधीचं सोनं करण्याऐवजी संपूर्ण मतदार संघच वाऱ्यावर सोडणाऱ्या लोखंडे यांनी बेजबाबदार वक्तव्य करुन मतदारांचा प्रचंड रोष ओढवून घेतला आहे. स्वतःच्या कर्तृत्वावर लोखंडे यांना जर खरंच विश्वास असेल तर मग लोखंडे यांनी विधानसभेची निवडणूक लढवून जिंकून दाखवावी, असं आव्हान त्यांना यानिमित्तानं दिलं जात आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या कामगारांना कंत्राटदाराने नुकसान भरपाई देण्याचे मा.कामगार न्यायालयाचे आदेश..! मावळा प्रतिष्ठानचे श्री.निलेश म्हसे पा.यांनी केला पाठपुरावा…

अहिल्यानगर महानगर पालिकेच्या कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या चार कंत्राटी कामगारांना कंत्राटदाराने प्रत्येकी...

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव!

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव! अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यातील शिक्षण विभागात...

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प:

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प: सावेडीतील...

पावसाळ्यापूर्वी शहरातील नालेसफाई पूर्ण करण्याचे आदेश ; बुधवारपासून टप्प्याटप्प्याने नालेसफाई सुरू करण्याचे नियोजन : आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे!

पावसाळ्यापूर्वी शहरातील नालेसफाई पूर्ण करण्याचे आदेश ; बुधवारपासून टप्प्याटप्प्याने नालेसफाई सुरू करण्याचे नियोजन : आयुक्त...