शिर्डी येथे नव्याने मंजूर झालेल्या एमआयडीसीमध्ये 1 हजार कोटी रुपयांच्या डिफेन्स क्लस्टरला मंजुरी!!
संरक्षण मंत्रालय, भारत सरकार आणि राज्य शासनाच्या वतीने शिर्डी एमआयडीसी येथे डिफेन्स क्लस्टरला उद्योगमंत्री मा. श्री. उदयजी सामंत साहेबांच्या माध्यमातून मंजुरी मिळाली आहे. या अंतर्गत शिर्डी एमआयडीसी येथील 200 एकर परिसरात 1 हजार कोटी रुपये खर्च करून एक मोठे डिफेन्स क्लस्टर उभारले जाणार आहे.
या डिफेन्स क्लस्टरच्या मध्ये राहाता तालुक्याचे भूमिपुत्र गणेश निबे यांच्या विमानाचे पार्ट्स बनविणाऱ्या कंपनीची घोषणा मा. उदयजी सामंत यांनी केली आहे. येत्या 10 दिवसात या डिफेन्स क्लस्टरचा एमओयू (MOU) शिर्डी येथे साईन करून त्या जागेचे भूमिपूजन केले जाणार आहे.
या 200 एकरावर उभ्या राहणाऱ्या डिफेन्स क्लस्टरच्या माध्यमातून जवळपास दोन ते अडीच हजार तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. तसेच उर्वरित एमआयडीसी विकसित करण्यामध्ये देखील फार मोठा फायदा होणार आहे.