शहीद पोलीस शिपाई अंबादास पवार यांच्या पत्नी कल्पना पवार यांना थेट पोलीस उपअधीक्षकपदी नियुक्ती
मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलेल्या पोलीस शिपाई अंबादास पवार यांच्या पत्नी श्रीमती कल्पना पवार यांना परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षकपदावरील थेट नियुक्तीचे आदेश प्रदान करण्यात आले. ही नियुक्ती करताना मुख्यमंत्री यांनी शहीद पोलीस आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी असलेली शासनाची कृतज्ञता आणि संवेदनशीलता पुन्हा एकदा प्रत्यक्ष कृतीतून दाखवली आहे.
मुख्यमंत्री यांच्या या निर्णयाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना कल्पना पवार म्हणाल्या, “माझ्या पतीप्रमाणेच मलाही आता देशसेवेची संधी मिळाली आहे. हे सरकार शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, लाडक्या बहिणींचे आणि देशाच्या रक्षणासाठी बलिदान देणाऱ्या शहीद वीरांचे आहे, हे माझ्या या नियुक्तीतून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.”