राजकारणशहर डीवायएसपी आणि काँग्रेस नेते किरण काळे यांच्यामध्ये कोतवालीमध्ये शाब्दिक चकमक; ...

शहर डीवायएसपी आणि काँग्रेस नेते किरण काळे यांच्यामध्ये कोतवालीमध्ये शाब्दिक चकमक; राजकीय दबावातून निलेश लंकेंच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्याचे षडयंत्र असल्याचा काँग्रेसचा आरोप

spot_img

प्रतिनिधि : कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये रात्री उशिरा हाय व्होल्टेज नाट्य पाहायला मिळाले. महा विकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या कार्यकर्त्यावर शहरातील एका खाजगी हॉटेलवर धाड मारून ताब्यात घेण्यात आले होते.

ही घटना समजताच शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्यासह काँग्रेस कार्यकर्त्यांनी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गर्दी केली. यावेळी शहराचे डीवायएसपी अमोल भारती आणि किरण काळे यांच्यामध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली. यामुळे काही वेळ वातावरण तणावपूर्ण झाले होते.

यावेळी भारती यांनी काळे यांना अटक करा असे फर्मान सोडले. त्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते संतापले. काळे यांनी कोतवाली पोलीस निरीक्षकांच्या दालनातच जमिनीवर बैठक मांडून मी कोणताही गुन्हा केलेला नाही. पण खोटा गुन्हा दाखल करून जर मला अटक करायची असेल तर मी त्या संघर्षाला सामोरे जायला तयार आहे.

मात्र हे हुकूमशाही वागणे संविधान विरोधी आहे. हा सत्तेचा गैरवापर आहे. आम्ही त्याचा निषेध करतो असे म्हणत डीवायएसपी भारती यांना चांगलेच धारेवर धरले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने त्या ठिकाणी पुनर्वसन करून देण्याची मागणी.

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने...

कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या कामगारांना कंत्राटदाराने नुकसान भरपाई देण्याचे मा.कामगार न्यायालयाचे आदेश..! मावळा प्रतिष्ठानचे श्री.निलेश म्हसे पा.यांनी केला पाठपुरावा…

अहिल्यानगर महानगर पालिकेच्या कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या चार कंत्राटी कामगारांना कंत्राटदाराने प्रत्येकी...

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव!

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव! अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यातील शिक्षण विभागात...

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प:

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प: सावेडीतील...