हिंदूंचा कायम तिरस्कार करणाऱ्या राहुल गांधी यांना पंढरपूरच्या वारीत सहभागी होण्याचं निमंत्रण देण्याचा अधिकार शरद पवार यांना कोणी दिला, असा सवाल भाजप प्रणित अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले यांनी उपस्थित केलाय.
भोसले यांनी म्हटलं आहे, की 84 वर्षांत शरद पवारांची पाय कधी वारीकडे वळले नाहीत. आता कोणत्या तोंडाने ते राहुल गांधी यांना वारीत सहभागी होण्याचं निमंत्रण देत आहेत?
कायम इफ्तार पार्ट्या झोडणारे शरद पवार, राहुल गांधी यांना कधीच वारी आणि वारकरी दिसले नाहीत. मात्र विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून तुम्ही हे करत असाल तर महाराष्ट्राची जनता दूध खुळी नाही, अशा स्पष्ट शब्दांत भोसले यांनी त्यांचं स्वतःचं मत मांडलं आहे. दरम्यान, 13 किंवा 14 जुलै रोजी राहुल गांधी विठुरायाचं दर्शन घेणार असल्याचं बोललं जात आहे.