राजकारणशरद पवारांकडून खेडमध्ये बेरजेचं राजकारण, पण कोणाच्या हाती देणार तुतारी?

शरद पवारांकडून खेडमध्ये बेरजेचं राजकारण, पण कोणाच्या हाती देणार तुतारी?

spot_img

शरद पवारांकडून खेडमध्ये बेरजेचं राजकारण, पण कोणाच्या हाती देणार तुतारी?

खेड प्रतिनिधी :: खेड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा उमेदवार कोण? असा प्रश्न निर्माण झालाय. दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहिते पाटील त्यांनाच पुन्हा उमेदवारी मिळणार अशी दाट शक्यता आहे.

तालुक्याचे माजी आमदार दिवंगत सुरेश गोरे यांच्या पत्नी मनीषाताई गोरे यांच्या उमेदवारीच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागल्या असून यामुळे मतदार संघाच्या राजकीय वर्तुळात रंगतदार चर्चांना उधाण आले आहे.

व्हायरल पोस्ट बरोबरच संभाव्य उमेदवार मनीषाताई गोरे यांचा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये लवकरच प्रवेश होणार असल्याची खात्री लायक माहिती समोर येत आहे. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेकडे डझन भर इच्छुक आहेत. त्यांच्यात उमेदवारी वरुन प्रचंड चुरस निर्माण झाली असताना शरद पवार यांनी या सर्वांना बाजुला सारुन ओबीसी प्रवर्गाच्या तेही महिला इच्छुक उमेदवाराला पुढे आणल्याने गेली काही महिने तयारी करणाऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अतुल देशमुख, अधिकृत पक्षात न प्रवेश झालेले मात्र तुतारी प्रबळ इच्छुक असणारे सुधीर मुंगसे, उद्धव ठाकरे गटाकडून बाबाजी काळे, अमोल पवार, अशोक खांडेभराड या सह अनेकांची राजकीय विकेट पडण्याची शक्यता आहे,

मनीषाताई गोरे यांच्या नावाची चर्चा सुरू झाल्यामुळे महाविकास आघाडीतील इच्छुक उमेदवारांच्या तोंडचे पाणी पळाले आहे, त्यामुळे राजकारणातील चाणक्य शरद पवार खेळ आळंदी विधानसभा मतदारसंघात कोणती राजकीय खेळी खेळतात हे पहावे लागेल.

मात्र मनीषाताई गोरे राजकीय प्रवेश आमदार दिलीप मोहिते यांना पुन्हा आमदार करण्यासाठी तर नाही ना? अशा देखील चर्चा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात होत आहेत,

गेल्या चार वर्षापासून गोरे कुटुंब अतिशय शांत होते, कुठलीही राजकीय घडामोडी नव्हती, जनसंपर्क देखील नव्हता, मात्र अचानकपणे मनीषाताई गोरे पुढे आल्यामुळे आमदार दिलीप मोहिते यांना अवघड झालेली निवडणूक पुन्हा सोपी होईल यात मात्र शंका नाही.

खेड विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवार अतुल देशमुख, बाबाजी काळे, सुधीर मुंगसे, बाबाजी काळे, अमोल पवार, अशोक खांडेभराड यांना अचानक पणे बाहेरचा रस्ता दाखवणे व आयात उमेदवाराला उमेदवारी देणे हे महाविकास आघाडीला मोठ्या तोट्याचे ठरू शकते तर दिलीप मोहितेंना पुन्हा आमदार करण्यासाठी सोप ठरू शकते.

दिवंगत आमदार सुरेश गोरे हे मुळ राष्ट्रवादीचे मात्र सन २०१४ मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून विधानसभा निवडणुक लढवली, त्यात ते यशस्वी ठरले. पुढच्या म्हणजेच २०१९ च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. दोन्हीं निवडणुका त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेकडून लढवल्या होत्या. यावेळी त्यांच्या पत्नी मनीषाताई गोरे राष्ट्रवादीत प्रवेश करून निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे बोलले जात आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

एक लाखाची लाच घेताना पोलीस अधिकारी, शिपाई जाळ्यात

ठाणे/ मिरा रोड : नयानगर पोलीस ठाण्यात तक्रारदार यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यात त्यांना मदत...

दारूची बाटली व पाच हजार रुपये रोख लाच घेतल्याबद्दल तीन पोलिसांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ने केला गुन्हा दाखल..!

दारूची बाटली व पाच हजार रुपये रोख लाच घेतल्याबद्दल तीन पोलिसांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने...

गॅस कंपनीच्या ठेकेदाराकडे तब्बल १० लाखांच्या खंडणीची मागणी.. एमआयडीसी पो.स्टे.ला गुन्हा दाखल..!

गॅस कंपनीच्या ठेकेदाराकडे तब्बल १० लाखांच्या खंडणीची मागणी.. एमआयडीसी पो.स्टे.ला गुन्हा दाखल अहिल्यानगर (दि.२४ प्रतिनिधी):-एमआयडीसीत...