उद्योग विश्वशनिशिंगणापूर इथं होणार 64 लाखांचा चौथरा ; प्रत्यक्ष कामाला झालाय प्रारंभ...!

शनिशिंगणापूर इथं होणार 64 लाखांचा चौथरा ; प्रत्यक्ष कामाला झालाय प्रारंभ…!

spot_img

नेवासे – (प्रतिनिधी दादा दरंदले) तालुक्यातल्या शनिशिंगणापूर इथं भाविकांनी दिलेल्या दानातून ६१ लाखांचा चौथरा तयार करण्याच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे.

शिंगणापूर येथे ४०० वर्षांपासून शनिमूर्ती चौथऱ्यावर विराजमान आहे. शनिमूर्तीचा चौथरा आकर्षक असावा, यासाठी एका शनिभक्तानं देवस्थानच्या विश्वस्त मंडळाकडे याविषयीची संकल्पना मांडली. त्यास विश्वस्त मंडळाने मान्यता दिली.

कर्नाटक राज्यातल्या हुबळी इथं चार महिने दगड, ग्रॅनाईट आणि रेड आग्रा फरशी घडविण्याचं काम पूर्ण करण्यात आलं. चौथाऱ्यासाठी लागणारा काळा ग्रॅनाईट तामिळनाडू राज्यातून मागविण्यात आला आहे.

सध्याचा १८ बाय १८ असलेला चौथरा आता २१ बाय २१ आकारात होणार आहे. सध्या जुन्या चौथऱ्याच्या बाजुला खोदकामास सुरुवात करण्यात आली असून नंतर जुन्या चौथऱ्याचंं ग्रॅनाईट काढून जमिनीच्या लेवलवर काँक्रीट केले जाऊन त्यानंतर यावर शिल्पकला बसविण्यात येणार आहे.

कर्नाटकी कोरीव नक्षीदार शिल्पकला असलेला चौथरा भाविकांना काही दिवसांत पाहायला मिळणार आहे. गेल्या अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर शनिशिंगणापूरचा पानसनाला सुशोभित करण्याचा प्रकल्प पूर्णत्वास आला आहे. या प्रकल्पामुळे जगप्रसिद्ध असलेल्या शनिशिंगणापूरच्या वैभवात भर पडली असून शनिभक्तांच्या गर्दीचा ओघ या परिसरात वाढू लागला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगर शहरात १८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा अभियान; स्वच्छता मोहीम, विविध स्पर्धा, जनजागृती उपक्रमांचे आयोजन!

नगर शहरात १८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा अभियान स्वच्छता मोहीम,...

मातंग समाज बांधवांना अमानुष मारहाण; समाजबांधवांमध्ये संतापाचं वातावरण; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन…!

मातंग समाज बांधवांना अमानुष मारहाण; समाजबांधवांमध्ये संतापाचं वातावरण; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन...! https://youtu.be/3qQe1iaN0Ds?si=Oz7mC4FL2vO0jZM5 देशाला स्वातंत्र्य मिळवूनदेखील...

महाराष्ट्रातील अन्न व औषध प्रशासन विभागावर माहिती अधिकार महासंघाचा खळबळजनक आरोप

राज्याच्या अन्न व औषध प्रशासन खात्यामध्ये भ्रष्टाचार वाढल्याचा आरोप करत या विभागातील महत्वाच्या पदांवर...

मातंग एकता आंदोलन वतीने पारनेर पोलीस निरीक्षक व तहसीलदार यांना निवेदन…

मातंग एकता आंदोलन वतीने पारनेर पोलीस निरीक्षक व तहसीलदार यांना निवेदन... कनगर तालुका राहुरी येथील...