गुन्हेगारीव्यापारी अपहरण आणि खंडणी प्रकरणातल्या मुख्य सुत्रधारासह एका आरोपीला अटक ; नाशिक...

व्यापारी अपहरण आणि खंडणी प्रकरणातल्या मुख्य सुत्रधारासह एका आरोपीला अटक ; नाशिक गुन्हे शाखेची कामगिरी…!

spot_img

विशेष पथकाचे पोउपनि मुक्तेश्वर लाड आणि पोलीस अंमलदार भगवान जाधव, पोलीस नाईक भूषण सोनवणे हे शहरात गस्त करत असतांना त्यांना गुप्त बातमीदाराकडून महत्वाची माहिती मिळाली.

20 लाख रुपयांच्या खंडणीसाठी शहरातल्या व्यापाऱ्याचं अपहरण करुन त्याला मध्यप्रदेशात घेऊन जात 10 लाख रुपये खंडणी घेणाऱ्या टोळीतला गुन्हा घडल्यापासून फरार असलेला मुख्य सुत्रधार आणि त्याचा साथीदार आरोपी शिर्डी येथे येणार आहे .

सदरची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके (गुन्हे शाखा) यांना देण्यात आली. वरिष्टांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक शिर्डी इथं रवाना झालं.

गुप्त बातमीतील आरोपींच्या शोध घेत असतांना आरोपी हे साई मंदिराच्या पाठीमागे पालखी रोडवरील हॉटेल साई संजय येथे आल्याची माहिती मिळताच या पथकानं शिर्डी पोलिसांच्या मदतीनं नमूद गुन्ह्यातील पाहिजे आरोपींना ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नाव गाव विचारपूस करता त्यांनी त्यांची नावं 1) शिवा रविंद्र नेहरकर (वय 23 वर्षे, रा. महाजन यांच्या घरात किरायाने, नंदनवन चौक, श्रीस्वामी समर्थ केंद्रा जवल, उत्तम नगर, सिडको, नाशिक), शुभम नानासाहेब खरात (वय 25 वर्षे, रा. संतोषी माता नगर, सयोग रबर कंपणीच्या पाठिमागे, सातपूर MIDC, नाशिक) आरोपी असे सांगितली.

त्या आरोपींना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता वर नमुद गुन्हा केल्याची कबुली देऊन गुन्हा केल्यापासून फरार झल्यांचं सांगितलं. दोन्ही आरोपींना गुन्ह्यांचा पुढील तपासकामी म्हसरुल पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिलं आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये मुख्य सूत्रधार शिव नेहरकर उर्फ चिक्कू हा असून तो गुप्ता यांच्या दुकानात कामाला होता. शिव यानेच त्याच्या मित्रांच्या मदतीने अपहरणाचा कट रचला होता.

सदरची कामगिरी संदीप कर्णिक (पोलीस आयुक्त), प्रशांत बच्छाव (पोलीस उप आयुक्त गुन्हे), संदीप मिटके (सपोआ गुन्हे), सपोनि ज्ञानेश्वर मोहिते, पोउपनि मुक्तेश्वर लाड, पोउनि दिलीप भोई, पोलीस हेडकॉन्स्टेबल किशोर रोकडे, पोलीस नाईक दत्ता चकोर, पोना रविंद्र दिघे, पोना भुषण सोनवणे, पोलीस अंमलदार भगवान जाधव, पोलीस अंमलदार अनिरुद्ध येवले यांनी केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास अहिल्यानगर - राजा शिवछत्रपती परिवार व स्नेहबंध सोशल...

एक लाखाची लाच घेताना पोलीस अधिकारी, शिपाई जाळ्यात

ठाणे/ मिरा रोड : नयानगर पोलीस ठाण्यात तक्रारदार यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यात त्यांना मदत...