दुकानाचं व्यावसायिक इलेक्ट्रिक मीटर कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न राबविता काढून घेऊन त्याठिकाणी इंडस्ट्रियल इलेक्ट्रिक मीटर बसवून देण्याच्या मोबदल्यात महावितरण कंपनीच्या उपकार्यकारी अभियंत्यानं तक्रारदाराकडून तब्बल एक लाख रुपयांची लाच स्विकारली. याप्रकरणी लाचखोर उपकार्यकारी अभियंत्याविरुद्ध नाशिक ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
किसन भीमराव कोपनर (वय-44 वर्षे, धंदा- नोकरी, उपकार्यकारी अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्या. पिंपळगाव उपविभाग, ता. निफाड, जि. नाशिक) (राहणार फ्लॅट नंबर के – 601, पार्क साईड, हनुमान नगर, मुंबई आग्रा हायवे जवळ, आडगाव शिवार नाशिक) असं त्या उपकार्यकारी अभियंताचं नाव आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे – वालावलकर,
मो. नं. 9371957391, माधव रेड्डी, अपर पोलिस अधिक्षक, ला. प्र. वि. नाशिक परिक्षेत्र नाशिक,
मो नं 9404333049, स्वप्निल राजपूत, वाचक पोलीस निरीक्षक, ला. प्र. वि. नाशिक,
मो. नं. 9403234142 यांच्या मार्गदर्शनाखाली
सापळा अधिकारी
संदीप बबन घुगे, पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक,
मो.नं. 8605111234, सापळा पथक पोलीस नाईक गणेश निंबाळकर, पोलीस शिपाई नितीन नेटारे यांच्या पथकानं केली.