राहुरी फॅक्टरी – दि. ०२ एप्रिल २४- राहुरी फॅक्टरी येथे राहणारे कामगार नेते तथा प्रहार जनशक्ती पक्षाचे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ कार्याध्यक्ष चंद्रकांत कराळे यांनी जीवे मारण्याची धमकी देऊन विनयभंग केला असल्याबाबतची तक्रार राहुरी फॅक्टरी येथील महिलेने राहुरी पोलीस ठाण्यात दिली होती. त्या विरोधात चंद्रकांत कराळे यांनी अटकपूर्व जामिनासाठी अहमदनगर येथील शेषन कोर्टात धाव घेतली असता मे. शेषन कोर्टाने दि. ०१ एप्रिल २०२४ रोजी दोन्ही पक्षाची बाजू ऐकुन घेवून चंद्रकांत कराळे यांना जामिन मंजुर केला.
याबाबत सविस्तर हकीकत अशी की, राहुरी फॅक्टरी येथील कारखाना कामगार वसाहती मध्ये राहत असलेल्या वय ६० वर्षे वयाच्या महिलेने तीच्या फिर्यादीनुसार त्या सायंकाळी ०७.४५ वा. कामावर जात असताना कराळे मागुन आले व मागून येऊन अंगावरील कपडे फाडले व अंगावर बसून अश्लील चाळे केले व लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले व फिर्यादीस म्हणाला की माझ्याशी संबंध ठेव नाहीतर मी तुला तलवारीने नाहीतर गावठी कट्ट्याने जिवे मारीन तेव्हा फिर्यादीने त्यास नकार दिला असता त्याने फिर्यादीच्या अंगावरील कपडे फाडून खाली पाडले व लाथा बुक्क्यांनी मारून टणक वस्तूने फिर्यादीचे डोक्यावर छातीवर व पाठीवर मारले वगैरे राहुरी पोलीसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
तथापी घटनेच्या प्रसंगी चंद्रकांत कराळे हे घटणे पासून जवळ्पास तीन किलोमिटर दूर असलेल्या एका हॉटेल मध्ये होते. त्याचा सीसी टीव्ही फुटेज मे. न्यायलयाने तपासून तसेच या पूर्वी या महिलेने वेगवेगळ्या लोकांवर अश्याच पध्दतीने केलेल्या केसेस विचारात घेऊन चंद्रकांत कराळे यांना जामिन मंजुर केला आहे.
प्रसंगी बोलतांना चंद्रकांत कराळे यांनी म्हंटले की, सत्य परेशान हो सकता हैं.. परास्त नही. पोलीस यंत्रणा व न्याय देवतेवर आमचा विश्वास असल्याने आम्हाला नक्की न्याय मिळेल याची खात्री असल्याने त्याप्रमाणे जामीन मंजूर झाला असून पुढील न्यायालयीन लढाई आम्ही नक्की जिंकू याची आम्हाला खात्री आहे.
कराळे यांचे बाजूने शेषन चे ॲड. एस. पी. कोळसे यांनी कोर्टात बाजू मांडली.