अहिल्यानगर – विधानसभा निवडणुकीत सहाव्या विजयानंतर राहुरी विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार शिवाजीराव कर्डिले यांचा जनता दरबार पुन्हा सुरू झाला आहे.निकालानंतर मुंबईत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी, सरकार स्थापनेचा बैठका आटोपताच बुधवारी बुऱ्हाणनगर येथील निवास्थानी सकाळी सात वाजता त्यांचा जनता दरबार सुरू झाला आहे.
जनता दरबारात वडारवाडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संजय धोत्रे, कैलास पगारे, बाळासाहेब तागडकर, गणेश डुकरे, सतीश तगडकर, उदय परदेशी, रवी बनसोडे, दीपक तागडकर, नितीन आळकुटे यांनी मतदार संघातील समस्या, अडचणी बाबत चर्चा केली व आमदार कर्डिले यांचा सत्कार केला.
यावेळी मतदार संघातील विविध भागातील आलेल्या नागरिकांच्या वतीने त्यांचे मोठ्या संख्येने सत्कार करण्यात आले.