राज्यातल्या अनेक विद्यार्थ्यांचे बारावीच्या निकालाकडे लक्ष लागून होतं. अखेर राज्याच्या शिक्षण मंडळानं बारावीच्या निकालाची तारीख जाहीर केली असून उद्या अर्थात दि. 21 रोजी दुपारी एक वाजता बारावीचा निकाल लागणार आहे. ऑनलाईन पद्धतीनं हा निकाल लागणार असून दि. पाच जूनपर्यंत विद्यार्थ्यांना गुण पडताळणी अर्ज करण्यासाठी (रिचेकींग) मुदत देण्यात आली आहे.
राज्य शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी बारावीच्या निकालाचे पत्र आज जाहीर केलं आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी आणि मार्चमध्ये बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. दरम्यान उद्या जाहीर होणारा बारावीचा निकाल खालील वेबसाईटवर विद्यार्थ्यांसह पालकांनादेखील पाहता येणार आहे.
mahresult.nic.in
mahahsscboard.in
hsc.mahresults.org.in
hscresult.mkcl.org
results.gov.in.