आपण भारतीय आजूबाजूच्या देशात काय चाललंय, त्या देशातले मंत्री जनतेशी कसं वागताहेत आणि आपले मंत्री आपल्याशी कसे वागताहेत, याचा कसलाच विचार करत नाहीत. विदेशातले आमचे काही मित्र सांगताहेत, त्यांचे मंत्री स्वतः फोन उचलतात, जनतेशी बोलतात, त्यांच्या समस्या गांभीर्यानं ऐकून त्या सोडविण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतात.
प्रश्न असा आहे, की विदेशातल्या मंत्र्यांच्या तुलनेत आपले मंत्री आपल्याशी कसं वागताहेत? ते स्वतःला लोकप्रतिनिधी म्हणवून घेतात. मात्र लोकांना त्यांच्याशी संपर्क साधायचा असेल किंवा आपल्या मंत्र्यांशी आपल्याला बोलायचं असेल तर आधी त्यांच्या पीएंना संपर्क करावा लागतो. तर हे कसले लोकप्रतिनिधी? हे तर बेजबाबदार नेते!
विदेशातल्या मंत्र्यांना पीए नसतात. ते स्वतःच जनतेशी संवाद साधतात. कामासाठी लोकांचे कितीही फोन आले तरी विदेशातले मंत्री कुठल्याही प्रकारची चीडचीड न करता सारं काही गंभीरपणे ऐकून त्यावर ‘सोल्युशन’ काढण्याचा प्रयत्न करतात, असं विदेशातले आमचे मित्र सांगताहेत.
आपल्याकडे तसं नाही. आपल्या एक एका मंत्र्यांकडे अनेक पीए असतात. मंत्री कशाला? आपल्याकडे आमदार, खासदार अगदीच जिल्हा परिषद अध्यक्ष आणि सदस्यांना अनेक पीए असतात.
या तथाकथित लोकप्रतिनिधींनी लोकशाहीवर तर कधीचाच बलात्कार केलाय. पण आपल्या मतांचीदेखील या लोकप्रतिनिधींनी कवडीइतकीही किंमत ठेवली नाही. त्यामुळे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत या लोकप्रतिनिधींना झटका द्यायला काय हरकत आहे?