लेटेस्ट न्यूज़विठ्ठलराव शिवरकर विद्यालयात नवागतांचे उत्साहात स्वागत

विठ्ठलराव शिवरकर विद्यालयात नवागतांचे उत्साहात स्वागत

spot_img

पुणे – विठ्ठलराव शिवरकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये नविन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांचे उत्साहात रांगोळ्या घालून, पुष्पवर्षाव करून व चॉकलेट वाटप करून स्वागत करण्यात आले. विठ्ठलराव शिवरकर सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब शिवरकर (माजी राज्यमंत्री ), सचिव चंद्रकांत ससाणे सर, दत्तोबा जांभूळकर ( सरपंच – वानवडी गाव देवस्थान ट्रस्ट, पुणे ), मायाताई ससाणे (सामाजिक कार्यकर्त्या) तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक लहू वाघुले सर यांच्या शुभहस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.

याप्रसंगी विद्यालयातील इयत्ता ८ वी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना चॉकलेट, गुलाबपुष्प व शालेय पुस्तकांचे वाटप करण्यात आले.

संस्थेचे सचिव चंद्रकांत ससाणे सर यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात संस्थेच्या वतीने शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांना संस्थेच्या वतीने शालेय साहित्य व शैक्षणिक गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न नेहमी केला जातो, सर्व विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा. खूप शिका, कष्ट करा, मोठे व्हा, असा मोलाचा संदेश दिला. तसेच शासनाने सुरु केलेल्या नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी काटेकोरपणे व्हावी, ही अपेक्षा व्यक्त केली.

माजी राज्यमंत्री व विठ्ठलराव शिवरकर सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब शिवरकर यांनी सर्व प्रथम सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत केले व नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय व देशभक्तीपर गीतांचे गायन करावे, आणि ते आपल्या अंत:करणातून व्हायला पाहिजे, ही अपेक्षा व्यक्त केली.. तसेच विद्यार्थ्यांमध्ये शालेय गोडी निर्माण व्हावी म्हणून “ही आवडते मज मनापासूनी शाळा ” हे प्र. के. अत्रे लिखित गीताचे गायन विद्यालयात नियमित करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षणव्यवस्थेचे तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक कार्याचा अभ्यास करावा, आज स्पर्धेच्या युगात शिक्षणाशिवाय पर्याय नाही, असे सांगितले. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी डॉक्टर, इंजिनियर, वकील, कलेक्टर, तसेच महाराष्ट्र शासनाच्या सचिव पदापर्यंत मजल मारावी,असे विद्यार्थी आपल्या विद्यालयातून घडावे, अशी विद्यार्थ्यांकडून अपेक्षा व्यक्त केली.विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन आपल्या आई वडिलांचे, शाळेचे तसेच आपल्या राष्ट्राचे नाव उंचवावे, असे सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य लहू वाघुले सर यांनी केले. यावेळी विद्यालयाच्या जडणघडणीचा व उन्नतीचा आढावा घेतला. तसेच संस्थेचे अध्यक्ष व माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांनी गोरगरीब विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये, म्हणून या विद्यालयाचा प्रारंभ केल्याचे सांगून हे कार्य आजही अव्याहतपणे चालू असल्याचे सांगितले. शाळेच्या सुरुवातीपासूनच साहेब सर्व विद्यार्थ्यांना मोफत वहया, बूट, शालेय गणवेश देत आहेत. या शाळेचे कर्तृत्व खूप मोठे आहे, असे सांगून असंख्य विद्यार्थी मोठ्या पदावर कार्यरत असल्याचे सांगितले. तसेच नवागतांचे स्वागत करण्यामागील हेतू विद्यार्थ्यांना उलगडून सांगितला. आई-वडिलांच्या कष्टाचे चीज करा, खूप शिकून मोठे व्हा, असे सांगून सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब शिवरकर, सचिव चंद्रकांत ससाणे सर, वानवडी गावचे सरपंच दत्तोबा जांभूळकर, मायाताई ससाणे, अनंतरावं शिवरकर,इब्राहिम शरीफ, रमेश काकडे, सुरेश तेलंग, सतिश सांगळे, रमेश जाधव, जगन्नाथ खोपकर, सूर्यकांत देडगे, चंद्रकांत तोंडारे, प्रवीण जाधव, दत्तात्रय शिवरकर, रहमान शेख, राजू अडागळे, अजित कवडे, गणेश कवडे, राजेंद्र डांगी, सर्व संचालक मंडळ विद्यालयाचे मुख्याध्यापक लहू वाघुले सर, सर्व शिक्षक वृंद, तसेच शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य लहू वाघुले सर यांनी केले.सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन दीपा व्यवहारे यांनी केले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लोकसभेच्या निवडणुकीत झालेली चूक अखंड समाजाने विधानसभेला भरून काढली… भाजपा आणि महायुतीच्या पारड्यात भरभरून मतदान – अमित गोरखे 

लोकसभेच्या निवडणुकीत झालेली चूक अखंड समाजाने विधानसभेला भरून काढली... भाजपा आणि महायुतीच्या पारड्यात भरभरून मतदान...

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास अहिल्यानगर - राजा शिवछत्रपती परिवार व स्नेहबंध सोशल...

एक लाखाची लाच घेताना पोलीस अधिकारी, शिपाई जाळ्यात

ठाणे/ मिरा रोड : नयानगर पोलीस ठाण्यात तक्रारदार यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यात त्यांना मदत...