गुन्हेगारीविक्रीस आणलेल्या गांजासह आरोपी जेरबंद ; अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

विक्रीस आणलेल्या गांजासह आरोपी जेरबंद ; अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

spot_img

आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांनी पोनि दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना अहमदनगर जिल्ह्यातील अवैध धंद्याची माहिती काढून त्यांच्याविरुध्द कारवाई करणेबाबत आदेशित केले होते.

नमूद आदेशान्वये पोनि आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि/हेमंत थोरात व अंमलदार बाळासाहेब मुळीक, संतोष खैरे, बाळासाहेब गुंजाळ, उमाकांत गावडे व मपोकॉ प्रियंका चेमटे अशांचे पथक नेमून जिल्ह्यातील अवैध धंद्यांची माहिती काढून कारवाई करणेबाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले.

हे पोलीस पथक कोपरगांव पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्दे करणा-या इसमांची माहिती काढत असतांना सपोनि हेमंत थोरात यांना दिनांक 31 मार्च रोजी इसम नामे प्रदीप बाजीराव पायमोडे (रा. मंजुर, ता. कोपरगांव) हा कब्जात गांजा बाळगून त्याच्या राहत्या घरी विक्री करतो, अशी गुप्तबातमीदारा मार्फत खात्रीशीर बातमी मिळाली.

त्यानंतर सदर पथकानं तात्काळ कोपरगांव तालुका पोलीस स्टेशन येथे जाऊन पोनि संदीप कोळी व स्टाफ तसेच पंच व साधने सोबत घेऊन छाप्याचे नियोजन केले.
पथकाने लागलीच बातमीतील नमूद ठिकाणी (मंजुर, ता. कोपरगांव) येथे जाऊन संशयित इसम नामे प्रदीप पायमोडे याचे वास्तव्याबाबत माहिती घेऊन, त्याच्या राहत्या घरासमोर जाऊन खात्री केली.

सदर घरात एक इसम लोखंडी कॉटवर बसलेला दिसला. त्यास पोलीस पथकाची ओळख सांगून त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव प्रदीप बाजीराव पायमोडे (वय 32, रा. मंजुर, ता. कोपरगांव) असे असल्याचे सांगितले. त्याचे घराची पंचांसमक्ष झडती घेतली असता त्याच्या घरातील कॉटवर पिवळ्या रंगाच्या गोणीत उग्र वास येत असलेल्या बिया बोंडे, काड्या पाने संलग्न असलेला पाला मिळून आला.

पोलीस पथकानं पिवळ्या रंगाच्या गोणीत मिळून आलेला बिया बोंडे, काड्या पाने संलग्न असलेला पाला याबाबत विचारणा केली असता त्यानं पिवळ्या रंगाच्या गोणीत बिया बोंडे, काड्या पाने संलग्न असलेला पाला हा गांजा असून विक्रीसाठी आणल्याचं सांगितल्याने आरोपी नामे 1) प्रदीप बाजीराव पायमोडे (वय 32, रा. मंजुर, ता. कोपरगांव) याच्या घरातील लोखंडी कॉटवर पिवळ्या रंगाच्या गोणीत ठेवलेला 1 लाख 06 हजार 150/- रुपये किंमतीचा 10 किलो 732 ग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ गांजा मिळून आल्याने तो हस्तगत करण्यात आला.

सदर प्रकरणी आरोपी विरुध्द पोकॉ बाळासाहेब अशोक गुंजाळ (नेमणूक – स्थानिक गुन्हे शाखा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन कोपरगांव तालुका पोलीस ठाण्यात (गु.र.नं. 115/2024 गुंगीकारक औषधिद्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ कायदा सन 1985 चे कलम 8 (क), 20 (ब) ii प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास कोपरगांव तालुका हे करीत आहे.

सदरची कारवाई राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहमदनगर व वैभव कलुबर्मे, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर, शिरीष वमने, उपविभागीय पोलीस अधिकारी, शिर्डी विभाग यांच्या सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकारी व अंमलदारांनी केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या सहकाऱ्यांनी ‘मायक्रो प्लॅनिंग’ आणि ‘टीमवर्क’ करून पुन्हा एकदा खेचून आणला दणदणीत विजय..!

आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या सहकाऱ्यांनी 'मायक्रो प्लॅनिंग' आणि 'टीमवर्क' करून पुन्हा एकदा खेचून आणला...

लोकसभेच्या निवडणुकीत झालेली चूक अखंड समाजाने विधानसभेला भरून काढली… भाजपा आणि महायुतीच्या पारड्यात भरभरून मतदान – अमित गोरखे 

लोकसभेच्या निवडणुकीत झालेली चूक अखंड समाजाने विधानसभेला भरून काढली... भाजपा आणि महायुतीच्या पारड्यात भरभरून मतदान...

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास अहिल्यानगर - राजा शिवछत्रपती परिवार व स्नेहबंध सोशल...