अविनाश देशमुख / शेवगांव
पाथर्डी तालुक्यात गेल्या पाच ते सहा महिन्यांमध्ये जबरी चोरी, धाडसी दरोडे, पशुधन चोरी, विद्युत मोटार चोरी, वाहन चोरी, कापूस चोरी, शेळ्या चोरी व जमीन लुटणे, प्लॉट लुटणे, बळजबरीने ताबा घेणे असे प्रकार अलीकडे वाढले आहेत.
दरम्यान, वरिष्ठ पोलीस अधिकारी पोलीस, जिल्हा अधीक्षक राकेश ओला, ॲडिशनल एस. पी. प्रशांत खैरे व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख दिनेश आहेर, अहमदनगर यांच्याकडे तक्रारी करण्यात येणार आहेत. यासंदर्भात उद्या (दि. २१) पाथर्डी शहर आणि तालूका बंद आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती शिवसेनेच्या शिंदे गटाचे तालुकाध्यक्ष विष्णुपंत ढाकणे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
ते म्हणाले, ‘आम्हाला वरिष्ठ पोलीस अधिकारी नक्कीच न्याय देतील. या देशामध्ये कायद्याचं राज्य चालेल. कुणाच्याही गुंडगिरीला भीक घालण्याची गरज नाही. आम्ही आमची लढाई कायद्याच्या मार्गाने लढणार आहोत’.