वाघोली येथील आव्हाळ वाडी रोडवर मातंग समाजाच्या घरांवर बेकायदेशीर पणे कारवाई करणार्या समाजकंटकांवर कायदेशीर कारवाई करा:- लोकसेवक युवराज दाखले
पुणे:- प्रतिनिधी, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना अन्न, पाणी,निवारा मिळणे हा नागरिकांनचा हक्क आहे.
परंतु वरील ठिकाणी चुकीच्या पद्धतीने बहुजन समाजाच्या प्रामुख्याने मातंग समाजातील घरांवर कार्यवाही करण्यात आली या निंदनीय कृत्यांचा शिवशाही व्यापारी संघ व सकल मातंग समाजाच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करुन संबंधित समाजकंटकांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी लोकसेवक युवराज दाखले यांनी संबंधित घटनास्थळी जाऊन करण्यात आली.
तात्काळ संबंधित समाजकंटकांवर कायदेशीर कारवाई न केल्यास बहुजन समाजाला सोबत घेऊन आंदोलन करण्यात येईल असा इशारा लोकसेवक युवराज दाखले यांनी दिला
यावेळी शिवशाही व्यापारी संघ संस्थापक अध्यक्ष लोकसेवक युवराज दाखले, पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश कलवले, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष शिवाजीराव खडसे, कार्याध्यक्ष अमोल लोंढे ,आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.