ब्रेकिंगवसंत लोढा यांचा सत्कार संपन्न

वसंत लोढा यांचा सत्कार संपन्न

spot_img

नगर-नाशिक विभागीय सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी व भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीवर आनंदी बाजार येथील रहिवासी वसंत लोढा यांची निवड झाली त्याबद्दल आज आनंदी बाजार मधील व्यापारी व रहिवाशी यांच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आला यावेळी अजय गुगळे,दिलीप पाठक,सुहास पाथरकर,श्रीकांत गायकवाड,शेखर गांधी,मुकुंद वाळके,इदू खानसाहेब,विनायक दिकोंडा,राजेंद्र गायकवाड,महेंद्र कवडे,संजय शहाणे,राजेंद्र कुलकर्णी,मनिष लोढा,संतोष भागवत,राजेंद्र भागानगरे,संतोष लोढा,प्रकाश सैंदर,संजय वल्लाकट्टी,सतिष रासने,कीरण देशमुख,रवि सग्गम ,राहुल लोढा,दिपक देहरेकर ,बाळासाहेब खताडे,संतोष लोढा,दिपक दंडनाईक,पवन बोगावत,तुषार डबीर,रवि चंवडके,संदिप शिंदे,भरत बागरेचा,कालिदास रासने,सागर शिंदे,सतिष विश्र्वरूप आदि उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या नाशिक विभागीय संचालक मंडळाची निवडणुक नुकतीच बिनविरोध झाली.यानंतर नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या बैठकीत नाशिक विभागीय पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी नगरच्या पंडित दिनदयाळ पतसंस्थेचे चेअरमन वसंत लोढा यांची बिनविरोध सर्वानुमते निवड करण्यात आली.तर भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीवर श्री लोढा यांची निवड करण्यात आली आहे.प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षाच्या संघटनात्मक नेमणुका अंतर्गत त्यांच्या नियुक्तीची घोषणा केली आहे.

यावेळी बोलताना वसंत लोढा म्हणाले, सहकारी पतसंस्था चळवळीमुळे राज्यातील छोट्या मोठ्या व्यवसायांना, नागरिकांना पत मिळून अर्थकारणाला चालना मिळाली आहे.ही चळवळ अर्थकारणासाठी अतिशय महत्वाची असून येत्या काळात पतसंस्था चळवळ बळकट करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील.पतसंस्थांसमोर कर्ज वसुलीचे मोठे आव्हान नेहमीच असते.प्रभावी कर्ज वसुलीसाठी उपाययोजना, शासनाकडे नियमावलीसाठी पाठपुरावा केला जाईल.
भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीवर निवड झाल्याने शहरात संघटन अजून मजबूत आहे भारतीय जनता पक्ष हा देशातील सर्वात मोठा पक्ष आहे. येत्या निवडणुकीत नगर शहराचा आमदार भाजपचा असणार आहे तसेच लोकसभा निवडणुकीत नगरला पुन्हा खासदार निवडून येईल आणि पंतप्रधानपदी नरेंद्र मोदीच विराजमान होतील यासाठी काम चालू आहे.गेल्या दहा वर्षात नगर शहराची बिकट परिस्थिती झाली आहे.ती सुधारण्यासाठी राष्ट्रीय व प्रदेश स्तरावरील नेत्यांशी संवाद साधून प्रयत्न करणार आहोत.यासाठी नगरकरांशीही संपर्क वाढवून त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचा प्रयत्न आहे.शासनाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी नेटाने प्रयत्न करणार आहे असेही ते म्हणाले.
यावेळी अनेकांनी त्याना शुभेछया दिल्या व मनोगत व्यक्त केले .

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या कामगारांना कंत्राटदाराने नुकसान भरपाई देण्याचे मा.कामगार न्यायालयाचे आदेश..! मावळा प्रतिष्ठानचे श्री.निलेश म्हसे पा.यांनी केला पाठपुरावा…

अहिल्यानगर महानगर पालिकेच्या कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या चार कंत्राटी कामगारांना कंत्राटदाराने प्रत्येकी...

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव!

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव! अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यातील शिक्षण विभागात...

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प:

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प: सावेडीतील...

पावसाळ्यापूर्वी शहरातील नालेसफाई पूर्ण करण्याचे आदेश ; बुधवारपासून टप्प्याटप्प्याने नालेसफाई सुरू करण्याचे नियोजन : आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे!

पावसाळ्यापूर्वी शहरातील नालेसफाई पूर्ण करण्याचे आदेश ; बुधवारपासून टप्प्याटप्प्याने नालेसफाई सुरू करण्याचे नियोजन : आयुक्त...