नगर- वसंत राठोड हे सध्या फक्त भाजपाचे सदस्य आहे भाजपामुळे त्यांना दोन वेळेस कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या उपाध्यक्ष पदाची संधी शासनाकडून मिळाली आहे, मात्र कायम प्रसिद्धीस हपापलेले राठोड यांनी भाजपाच्या शहर जिल्हाध्यक्षवर खोटे नटे आरोप करून पक्षाची बदनामी केली आहे असे प्रतिपादन भाजपाचे जिल्हा सरचिटणीस महेश नामदेव यांनी केले यावेळी भाजप मंडळ अध्यक्ष श्याम बोळे हेही उपस्थित होते.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला नगरमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. शहर नेतृत्वाच्या ढिसाळ नियोजना अभावी व गटातटाच्या कारभारामुळे सुजय विखे-पाटील यांचे शहरातील मताधिक्य कमी झाले आणि त्यांचा पराभव झाला, असा आरोप करत याबाबत थेट पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंदशेखर बावनकुळे यांच्याकडे भिंगार छावणी परिषदेचे उपाध्यक्ष वसंत राठोड यांनी तक्रार करून भाजापा शहर जिल्हाध्यक्ष अॅड. अभय आगरकरांची तातडीने हकालपट्टी करण्याची मागणी पत्रकाद्वारे केली आहे. त्यावर आज नामदे यांनी उत्तर दिले.
राठोड यांचे विधान अत्यन्त चुकीचे असून निषेधार्थ आहे. त्यांना निवडणुकीत प्रसिद्धी मिळाली नाही, त्यांना जो विषय मांडायचा होता तो प्रोटोकॉल नुसार प्रथम जिल्हा भाजपा पक्षाला निवेदन देऊन नंतर प्रदेश अध्यक्षांना पाठवले पाहिजे होते, त्याचे उत्तर येण्याची वाट न पाहता त्यांनी प्रसिद्धी माध्यमाकडे पाठवले अर्थात हे आरोप चुकीचे आहे .
राठोड हे भिंगारचे दोन टर्म मंडल अध्यक्ष होते. त्याकाळात त्यांनी नवीन कार्यकर्ते जोडले नाही, पक्ष वाढीसाठी प्रयत्न केले नाही, पक्षाचे काम वाढवले नाही त्या काळात त्यांनी फक्त स्वतःपुरता ठेवला आणि मी आणि मी अशा वृत्तीच्या पद्धतीने ते वागलेत्यासाठी त्यांनी पक्षाचे नेते आले की त्यांना इच्छा पुढे पुढे करून पदे मिळवली आणि पक्षाची बदनामी करायची हे ध्येय ठेवले त्यांचे म्हणणे आहे. बूथ प्रमुख बदलले पण तो अधिकार अध्यक्षांचा आहे. सर्वानी काम केले ,नियोजन केले म्हणून तर १९५० मताचे मताधिक्य भिंगार मधून मिळाले आहे त्यांच्या बोलण्याच्या भाजपा भिंगार निषेध करत असून लवकरच मिटिंग घेऊन त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी आम्ही करणार आहोत असेही नामदे म्हणाले.