वडारवाडीच्या ‘त्या’ ‘खुल्या शौचालया’ची ग्रामस्थांनाच वाटतेय लाज ; पण ग्रामसेवक, प्रशासक आणि बीडीओ झालेत भलतेच निर्लज्ज ; नगर झेडपी सीईओ आशिषजी येरेकरसाहेब! ‘एसी ऑफिस’मधून जरा बाहेर निघा…!
नगर – नगर शहराजवळ जगाच्या पाठीवर वडारवाडी अशी एकमेव विचित्र ग्रामपंचायत आहे, की ज्या ग्रामपंचायतीला गावठाणच नाही. परिणामी वडारवाडी ग्रामपंचायत हद्दीत सार्वजनिक शौचालयाची योजनाच राबवता येत नाही. त्यामुळे वडारवाडीतून ईएमई कॉलनी मध्ये जाताना रस्त्यावर अनेक जण सकाळी व रात्री उघड्यावरच अंगत पंगत असा ‘सामूहिक संडास’चा कार्यक्रम पार पाडत आहेत.
या पार्श्वभूमीवर नगर झेडपीचे सीईओ आशिष येरेकर यांना जाहीर आवाहन करावसं वाटतं, की ‘ सीईओ साहेब, जरा तुमच्या त्या एसी ऑफिस’मधून बाहेर निघा आणि तुमच्या अधिपत्याखाली येणारी वडारवाडी ग्रामपंचायतीतील हे घाणेरडं दृश्य नजरेखालून घाला. कारण वडारवाडीचे ग्रामसेवक, प्रशासक आणि बीडीओ भलतेच निर्लज्ज आणि निष्क्रिय झाले आहेत. पगारा एवढंही काम ही मंडळी करायला तयार नाही.
ग्रामस्थांचे प्रश्न, आणि समस्या निवारण करण्यासाठी सरकारने या लोकांची नेमणूक केली आहे. परंतू प्रश्न हा आहे, की ही मंडळी सरकारच्या पगारावर समस्यांचे निवारण करण्याऐवजी समस्या निर्माण करण्याचं काम करताहेत की काय? यांना या उघड्यावर सौचालयाबाबत वेळोवेळी तोंडी, लेखी तक्रारी करूनही काही उपयोग होत नाही. या तिघांच्या निष्क्रिय कामकाजामध्ये नागरिक नरकयातना भोगत आहे.
फार दिवसांपूर्वी नगरच्या जिल्हा परिषदेच्या प्रशासनानं ‘गुड मॉर्निंग’ पथक सुरु केलं होतं. सकाळी उघड्यावर शौचाला बसणाऱ्या संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्याचं काम या पथकाद्वारे केलं जायचं. हे पथक पुन्हा कधी कार्यरत होणार आणि वडारवाडीत उघड्यावर शौचाला बसत असलेल्या मंडळींविरुद्ध कधी कारवाई होणार? असा प्रश्न स्थानिक ग्रामस्थांना भेडसावत आहे.
ग्रामपंचायतीने महिलांना पर्यायी जागा उपलब्ध करून दिल्यास या भागातील परिसर स्वच्छ राहील त्यासाठी प्रशासनाने लवकरात लवकर योग्य ती कारवाई करावी.