राजकारणवंचित बहुजन आघाडीच्या पाथर्डी तालुका अध्यक्ष पदी श्रीकांत बोर्डे यांची निवड 

वंचित बहुजन आघाडीच्या पाथर्डी तालुका अध्यक्ष पदी श्रीकांत बोर्डे यांची निवड 

spot_img

वंचित बहुजन आघाडीच्या पाथर्डी तालुका अध्यक्ष पदी श्रीकांत बोर्डे यांची निवड 

पाथर्डी (प्रतिनिधी )-आज मंगळवार रोजी वंचित बहुजन आघाडीच्यापाथर्डीतालुका कार्यकारिणी निवडीसाठी पाथर्डी येथील शासकीय विश्रामगृह येथे मुलाखती वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय सदस्य तथा राज्य उपाध्यक्ष प्रा किसन चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आल्या प्यावेळी वंचित बहुजन आघाडी अहिल्या नगर जिल्हा अध्यक्ष योगेशभाऊ साठे उपस्थित होते.

यावेळी पाथर्डी तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी मुलाखती दिल्या या प्रसंगी जिल्हा महासचिव प्रसाद भिवसेन,शेवगाव तालुका अध्यक्ष शेख प्यारेलालभाई , पाथर्डी महीला तालुका उपाध्यक्ष रोहिणी ठोंबे,जिल्हा संघटक रवींद्र निळ, सुधीर ठोंबे, जिल्हा सल्लागार जेडी सिरसाठ, सुरेश जाधव, महेंद्र राजगुरू सर,अमोल मिरपगार, आकाश शिंदे, पोपट मिरपगार,आयु भिमराव शिंदे, डॅनियल मिरपगार,आयु प्रविण बळीद, देविदास भारस्कर, आनंद उबाळे, सचिन निळ, दत्तात्रय सातपुते, गणेश पाटोळे, विलास वाघमारे रवींद्र मिरपगार,राजू पवार, श्रीकांत ( पप्पूशेठ) बोर्डे शुभम जगदाळे भारतीय बौद्ध महासभेचे पाथर्डी तालुका अध्यक्ष श्रीपत बळीद व ईतर सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

सर्वानुमते चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत (पप्पूशेठ) बोर्डे यांची पाथर्डी तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.

यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना प्रा किसन चव्हाण म्हणाले कि प्रस्थापीत सगळेच पक्ष बहुजन समाजाच्या मतांचा वापर फक्त सत्तेत जाण्यापूरताच करतात आणि नंतर त्यांच्या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात त्यामुळे सध्याला राज्यात बहुजणांच्या संविधानिक हक्क अधिकाराची लढाई फक्त वंचित बहुजन आघाडीच करत आहे तरी यापुढे सर्वांनी बहुजन समाजातील मूलभूत प्रश्नासाठी जागरूक राहून लोकशाही मार्गाने आंदोलन करून प्रश्न सोडवावे लागेल गावोगाव स्वभामानी तरुणाचे संघटन उभे करुन भविष्यात राजकीय सत्तेचा वाटा घरण्यासाठी कसोशीने प्रयत्न करू.

यावेळी उपस्थितांचे आभार युवा कार्यकर्ते आकाश शिंदे यांनी मानले

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अहिल्या नगर जिल्हा परिषदेत प्रशासनाची मनमानी; पात्र ठेकेदार कंपनीला डावलून अपात्र कंपनीला दिलं काम…!

अहिल्या नगर जिल्हा परिषदेत प्रशासनाची मनमानी; पात्र ठेकेदार कंपनीला डावलून अपात्र कंपनीला दिलं काम...! महासत्ता...

महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना (आदिवासी विकास विभाग) तसेच महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोग सुद्धा स्वतंत्रपणे कार्यरत राहणार; मंत्रिमंडळ निर्णय

अजित केसराळीकरांच्या मागणीला आले यश…. मंगळवार, दि. ३ जून २०२५ रोजी मंत्रिमंडळ निर्णय महाराष्ट्र राज्य अनुसूचित...

तब्बल ३३ वर्षांनंतर आमदार अमित गोरखे यांच्या निधीतून पिंपरी-भाटनागर येथील बौद्ध विहाराचे सुशोभीकरण…  नूतन धम्मविहाराचे उद्घाटन मंगलमय वातावरणात संपन्न..!

तब्बल ३३ वर्षांनंतर आमदार अमित गोरखे यांच्या निधीतून पिंपरी-भाटनागर येथील बौद्ध विहाराचे सुशोभीकरण...  नूतन...

2 दरोडे व 4 घरफोडीच्या गुन्हयात फरार आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद… आरोपीकडून 1,19,000/-रू किं.मुद्देमालासह 5 घरफोडीच्या गुन्हयांची उकल!

2 दरोडे व 4 घरफोडीच्या गुन्हयात फरार आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद... आरोपीकडून 1,19,000/-रू किं.मुद्देमालासह...