लोकसभा निवडणुकीतल्या चौथ्या टप्प्यातलं मतदान महाराष्ट्रात सुरु आहे. अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यात मतदारांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. दुपारपर्यंत सरासरी 40 टक्के मतदान झाल्याचं सांगण्यात आलं.
नगर दक्षिण आणि उत्तर लोकसभा मतदारसंघात मोठी चुरस पाहायला मिळत आहे. सकाळपासूनच मतदारांनी मतदानासाठी रांगा लावल्या होत्या. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
मतदान केंद्राच्या बाहेर मतदारांची लगबग सुरू होती. नव मतदार, युवक, युवती, वयोवृद्ध महिला आणि पुरुष या सर्वांनी मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान, सायंकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी 60 ते 65 टक्के मतदान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.