राजकारणलोकसभेच्या पालघर सहसंपर्क प्रमुखपदी केदार काळे, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नियुक्ती.. लोकसभेचा उमेदवार विजयी...

लोकसभेच्या पालघर सहसंपर्क प्रमुखपदी केदार काळे, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नियुक्ती.. लोकसभेचा उमेदवार विजयी करण्याचे मोठे आव्हान

spot_img

पालघरः ( योगेश चांदेकर) शिवसेनेचे प्रवक्ते आणि राजकारणात गेल्या तीन दशकांपासून सक्रिय असलेल्या केदार काळे यांच्यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालघर लोकसभा सह संपर्क प्रमुखपदाची जबाबदारी टाकली आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काळे यांची ही नियुक्ती करण्यात आल्याने त्याला विशेष महत्त्व आहे.

लोकसभेचा पालघर मतदार संघ शिवसेनेच्या शिंदे गटाकडे राहावा, यासाठी एकीकडे प्रयत्न चालू असतानाच दुसरीकडे शिवसेनेच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी संघटनात्मक बदल करण्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी भर दिला आहे याबाबतच्या धोरणानुसारच काळे यांची सहसंपर्क प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रचार आणि प्रसराची जबाबदारी
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण आणि पक्षाचा प्रचार आणि प्रसार करण्याची जबाबदारी आता काळे यांच्यावर टाकण्यात आली आहे. काळे शिवसेनेचे प्रवक्ते आहेत. त्यांनी 2019 मध्ये शिवसेनेत प्रवेश केला. शिंदे यांनी राज्यात सत्तांतर घडवून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याने काळेदेखील शिंदे यांच्यासोबत गेले. त्यांच्या पत्नी डॉ. उज्वला काळे या पालघरच्या नगराध्यक्ष आहेत.

सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमात आघाडीवर
केदार काळे गेल्या 29 वर्षापासून राजकारणात सक्रिय आहेत. ते रेल्वेच्या डी. आर. यु. सी. सी. समितीचे सदस्य असून मुंबईच्या आर्यन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आहेत. पालघर सांस्कृतिक मित्र मंडळाचे अध्यक्ष म्हणूनही ते पालघरमध्ये अनेक सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम राबवत असतात.

निवडणुकीत महत्त्वाची भूमिका
पालघर लोकसभा मतदारसंघ सध्या शिवसेनेकडे आहे. या मतदारसंघातून खासदार राजेंद्र गावित शिवसेनेचे लोकसभेत प्रतिनिधित्व करतात. या मतदारसंघावर भाजपने दावा केला असला, तरी आता पुन्हा हा मतदारसंघ पुन्हा शिवसेनेकडे राहावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. गावित यांच्या निवडणुकीचे नियोजनही काळे यांना करावे लागण्याची शक्यता आहे. प्रवक्ते पद आणि लोकसभा सह संपर्कप्रमुख अशा दोन जबाबदाऱ्या आता त्यांना यापुढे पेलाव्या लागतील.

तीन महिने आव्हानात्मक काम
लोकसभा सह संपर्कप्रमुख या नात्याने शिवसेनेच्या समन्वयाची जशी जबाबदारी त्यांच्यावर आहे, तसेच महायुतीतल्या मित्रपक्षांच्या समन्वयाची जबाबदारी त्यांच्यावर आली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी काळे यांचे काम लक्षात घेऊन त्यांची या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती केली आहे. आगामी दोन-तीन महिने तर काळे यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या सहकाऱ्यांनी ‘मायक्रो प्लॅनिंग’ आणि ‘टीमवर्क’ करून पुन्हा एकदा खेचून आणला दणदणीत विजय..!

आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या सहकाऱ्यांनी 'मायक्रो प्लॅनिंग' आणि 'टीमवर्क' करून पुन्हा एकदा खेचून आणला...

लोकसभेच्या निवडणुकीत झालेली चूक अखंड समाजाने विधानसभेला भरून काढली… भाजपा आणि महायुतीच्या पारड्यात भरभरून मतदान – अमित गोरखे 

लोकसभेच्या निवडणुकीत झालेली चूक अखंड समाजाने विधानसभेला भरून काढली... भाजपा आणि महायुतीच्या पारड्यात भरभरून मतदान...

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास अहिल्यानगर - राजा शिवछत्रपती परिवार व स्नेहबंध सोशल...