राजकारणलोकसभेच्या उमेदवारीवरून शिवसेना-भाजपच्या पदाधिकऱ्यांमध्ये कलगीतुरा: पालघरच्या राजकीय धोबीघाटावर परस्परांचे वस्त्रहरण.....

लोकसभेच्या उमेदवारीवरून शिवसेना-भाजपच्या पदाधिकऱ्यांमध्ये कलगीतुरा: पालघरच्या राजकीय धोबीघाटावर परस्परांचे वस्त्रहरण.. स्थानिक नेत्यांत रुंदावतेय मतभेदाची दरी..!

spot_img

पालघरः पालघर लोकसभा मतदारसंघ कुणाला सोडायचा यावरून शिवसेनेचा शिंदे गट आणि भारतीय जनता पक्षात वरिष्ठ स्तरावर चर्चा चालू असताना पालघर जिल्ह्यात मात्र स्थानिक स्तरावर वाद सुरू आहेत.जिल्हा पातळीवरचे पदाधिकारी एकमेकांची आणि पक्षांची उणीदुणी काढत असून त्यामुळे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये मतभेदाची दरी रुंदावत आहे.

पालघर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या शिंदे गटाचे खासदार राजेंद्र गावित यांना भाजप आणि शिवसेनेतूनही विरोध होत आहे. पत्रकार परिषद घेऊन हा मतदारसंघ भाजपला का सोडावा हे सांगताना भाजप पालघर जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांनी शिवसेनेच्या शिंदे गटाची पालघर लोकसभा मतदारसंघात ताकद किती, त्यांचे मतदार किती आदींचा उल्लेख केला. शिंदे गटाचे मतदान केवळ सात-आठ टक्के असल्याचे या पदाधिकाऱ्याने सांगितले.

उमेदवारीच्या स्पर्धेतून विरोध
एकीकडे भाजपतील पदाधिकारी खासदार गावित यांना विरोध करत असताना दुसरीकडे खासदार गावित ज्या शिंदे गटाच्या शिवसेनेचे आहेत, त्या शिंदे गटातूनच त्यांना विरोध झाला आहे. त्यांचे पक्षांतर्गत स्पर्धक त्यांच्यावर टीका करीत असून लोकसभेकरीता इच्छुकांची संख्या पण वाढली आहे

भाजपपेक्षा जास्त ताकदीचा शिंदे गटाचा दावा
शिवसेना आणि भाजपमध्ये यावरून वाद सुरू असताना आता शिवसेनेच्या एका उपजिल्हाप्रमुखांनी भाजपच्या जिल्हाध्यक्षांवर टीका केली आहे. मतदारसंघ कोणाला आणि उमेदवार कोण हे भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे पक्षश्रेष्ठी ठरवतील. तो अधिकार स्थानिक पातळीवर नाही. त्यामुळे उगीच उणीदुणी काढू नये, असे आवाहन शिवसेनेच्या उपजिल्हा प्रमुखांनी केले. हे करताना त्यांनी भाजपपेक्षा आपली ताकद कशी जास्त आहे, हे सांगण्याचा प्रयत्न केला.मात्र दोन्ही पक्षात इच्छुकांची संख्या का वाढते आहे यावर मात्र दोन्ही पक्षांच्या पदाधिकारी यांनी यावर बोलणे आवश्यकत असतांना मात्र एकमेकांवर निशाणा साधला आहे

नगरपालिका,नगरपंचायत, जिल्हा परिषदेतील सत्तेची उदाहरणे
शिवसेनेचा खासदार, शिवसेनेचा आमदार, पालघर जिल्हा परिषद ताब्यात, पालघर नगरपरिषद ताब्यात आणि जव्हारसह अन्य ठिकाणी असलेली राजकीय ताकद पाहता कोण किती पाण्यात आहे हे सांगू नये, असा सल्ला एका उपजिल्हाप्रमुखाने दिला. भाजपचा जिल्ह्यात एकही आमदार नसल्याचे त्याने निदर्शनास आणले आहे. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख आणि भाजपच्या जिल्हाप्रमुखातील कलगीतुरा आता चांगलाच गाजत आहे.

भाजपचेही प्रत्युत्तर
भारतीय जनता पक्षाची या मतदारसंघात ताकद नसेल, तर लोकसभेच्या निवडणुकीसाठी एवढे इच्छुक कसे असा सवाल करून १९८९ पासून या मतदारसंघातून भाजपला मिळत असलेली मते तसेच पालघर मतदारसंघ स्थापन झाल्याच्या वीस वर्षांत दोनदा भाजपचा उमेदवार निवडून कसा गेला, असा सवाल भाजपच्या पदाधिकाऱ्याने शिंदे गटाला विचारला आहे.

पालघरच्या धोबीघाटावर राजकीय धुणी
दोन मित्र पक्षातील पदाधिकारी परस्परांची राजकीय वस्त्रे पालघरच्या धोबी घाटावर धूत असल्याने पालघर जिल्ह्यातील जनतेची मात्र चांगलीच करमणूक होत आहे. महाविकास आघाडी त्याचा फायदा घेण्याची शक्यता आहे एकूणच या मतदार संघात अजूनही लोकसभेसाठी कोणत्याही पक्षाने आपला उमेदवार जाहीर न केल्याने चर्चेत आणि इच्छुक या संख्येत वाढ होत असून त्यामुळे या लोकसभा मतदार संघात नेमके उमेदवार कोण असतील याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे

युतीधर्म पाळण्याची गरज
भाजप आणि शिवसेनेत काही मतभेद असतील, तर ते पक्षांतर्गत पातळीवर मिटवले पाहिजेत. त्यासाठी मित्रपक्षांची समन्वय समिती आहे. या समितीपुढे चार भिंतीच्या आत आपले म्हणणे मांडण्याऐवजी परस्परांविरोधात माध्यमांसमोर टीका केली जात असल्याने युतीधर्म पाळला जात नाही.युतीधर्म पाळण्यासाठी आणि अन्याय दूर करण्यासाठी समन्वय समितीत म्हणणे मांडायला हवे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या सहकाऱ्यांनी ‘मायक्रो प्लॅनिंग’ आणि ‘टीमवर्क’ करून पुन्हा एकदा खेचून आणला दणदणीत विजय..!

आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या सहकाऱ्यांनी 'मायक्रो प्लॅनिंग' आणि 'टीमवर्क' करून पुन्हा एकदा खेचून आणला...

लोकसभेच्या निवडणुकीत झालेली चूक अखंड समाजाने विधानसभेला भरून काढली… भाजपा आणि महायुतीच्या पारड्यात भरभरून मतदान – अमित गोरखे 

लोकसभेच्या निवडणुकीत झालेली चूक अखंड समाजाने विधानसभेला भरून काढली... भाजपा आणि महायुतीच्या पारड्यात भरभरून मतदान...

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास अहिल्यानगर - राजा शिवछत्रपती परिवार व स्नेहबंध सोशल...