नगर.:-जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशानुसार लोकसभा निवडणूक 2024 अनुषंगाने शेवगाव पोलीस स्टेशन हद्दीतील बोधेगाव चापडगाव व शेवगाव शहरात निवडणूक शांततेत पार पडल्या पडाव्यात यासाठी कायदा व संस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी आज दि. 18/03/2024 रोजी रुटमार्चसाठी शेवगाव पोलीस स्टेशनचे 03 पोलीस अधिकारी, 20 पोलीस अंमलदार, 10 होमगार्ड व बी.एस.एफ चे अधिकारी पोलीस निरीक्षक शैलेश मिश्रा व 40 अंमलदार असे हजर होते. सकाळी 11/00 वा. ते 11/45 वा. दरम्यान बोधगाव, सकाळी 12/00 वा. ते 12/45 वा. दरम्यान चापडगाव, सकाळी 02/15 वा. ते 03/30 वा. दरम्यान शेवगाव शहरातील क्रांतीचौक-शिवाजी चौक-भगतसिंग चौक-नाईकवाडी मोहल्ला-धनगरगल्ली –मोची गल्ली- आंबेडकर चौक-क्रांती चौक, सकाळी 04/00 वा. ते 04/45 वा. दरम्यान अनुषंगाने अमरापुर याठिकाणी रुट मार्च काढण्यात आला.
लोकसभा निवडणुक 2024 अनुषंगाने शेवगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये निवडणूक शांततेत पार पाडाव्यात. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये नागरिकांमध्ये कायद्याचा धाक निर्माण व्हावा गुन्हेगारावरती वचक निर्माण होऊन जेणेकरून येणाऱ्या निवडणुका शांततेत पार पडतील यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे शे बप्पासाहेब धाकतोडे वगावचे उपयोगी पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिगंबर भदाने पोलीस उपनिरीक्षक नीरज बोकील गुप्तवार्ता विभागाचे बप्पासाहेब धाकतोडे, श्याम गुंजाळ, संपतराव खेडकर व सर्व कर्मचारी यांनी शेवगाव शहरातील सर्व चौका चौकात रूटमार्च काढून लोकसभेच्या पार्श्वभूमीवर कायद्याचा धाक निर्माण व्हावा यासाठी रूट मार्च काढून गुन्हेगारांच्या मनामध्ये पोलिसांचा वचक निर्माण व्हावा यासाठी संचालन करण्यात आले.