नुकत्याच होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक विभागाचे पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील यांनी नगरच्या दौऱ्यावर येत इथल्या पोलीस अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना करत या निवडणुकीत कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची काटेकोरपणे काळजी घ्या, असे आदेश दिले.
नगर जिल्ह्याच्या सद्यस्थितीवर पोलिसांचं चांगल्या पद्धतीचं नियंत्रण असल्याचं आयजी बी. जी. पाटील यांनी ‘महासत्ता भारत’शी अनौपचारिकपणे बोलताना सांगितलं.
ते म्हणाले, ‘संपूर्ण राज्यात नगर जिल्ह्याचं क्षेत्रफळ मोठं आहे. त्यामुळे पोलिसांवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची फार मोठी जबाबदारी आहे. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांच्या त्याचप्रमाणे सोशल मिडिया युजर्सच्या हालचालींवर बारकाईनं लक्ष ठेवण्याचे आदेश नगरच्या पोलिसांना देण्यात आले आहेत’. नगर जिल्ह्यातल्या बहुतांश पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी या बैठकीला हजर होते.
जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, शहर विभागाचे डी. वाय. एस. पी. अमोल भारती, गृह शाखेचे पोलीस उपाधीक्षक हरीष खेडकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर आदी या बैठकीला हजर होते.