प्रसिद्ध राजकीय विश्लेषक प्रशांत किशोर यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. ते म्हणताहेत, की लोकसभा निवडणुकीत भाजपला 303 जागा मिळणार आहेत. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत. हे भविष्य जर खोटं ठरलं तर स्वतःच्या तोंडाला शेण फासणार, असा खळबळजनक दावा प्रशांत किशोर यांनी केला आहे.
या संदर्भात क्रिकेटचं उदाहरण देताना प्रशांत किशोर म्हणाले की, तुम्ही कुठल्याही दबावाशिवाय एक शतक पूर्ण केलंय. पण दुसरे शतक सहा झेल सुटल्यानंतर केलं, अशातला हा प्रकार आहे. अमेठीची जागा राहुल गांधी किंवा प्रियंका गांधी यांना द्यायला हवी होती, असंही ते म्हणाले.
आंध्रप्रदेशमध्ये जर जगमोहन रेड्डींना 151 पेक्षा जास्त जागा मिळाल्या तर माझ्या (प्रशांत किशोर) तोंडावर शेण पडेल. हे जर खरं ठरलं तर रेड्डी यांच्या तोंडावर शेण पडेल, असा दावा प्रशांत किशोर यांनी केला आहे.