पुणे – लोकशाही युवा फाउंडेशन महाराष्ट्र राज्याची चिंचवड पुणे येथे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष माननीय शहाबुद्दीन एम शेख संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्ष खाली मीटिंग संपन्न झाले यावेळी लोकशाही फाउंडेशनचे सर्व महाराष्ट्र राज्यातील प्रमुख पाहुणे उपस्थित होते सदरची संस्था रजिस्ट्रेशन असून ही संस्था संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये गोरगरीब लोकांचे प्रश्न घेऊन मार्गदर्शन करते आणि त्यांना न्याय मिळवून देते.
या मीटिंगमध्ये सर्वानुमते आरिफ शेख यांची महाराष्ट्र राज्य कायदेशीर सल्लागार पदी नियुक्ती करण्यात आली. आरिफ शेख यांनी आपल्या भाषणातून सांगितले की, मी सर्वांना मोफत कायदेशीर सल्ला देण्याचे काम करणार आहे.
आयुब पापा भाई शेख समाजसेवक यांचे जिल्हा अध्यक्ष अहमदनगर पदी नियुक्ती करण्यात आली व युनूस अकबर शेख मुख्याध्यापक यांची जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली यावेळी सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला आणि खूप आनंदाचे वातावरणामध्ये खेळीमेळीच्या वातावरणामध्ये मीटिंग संपन्न झाली.