अगदी बालवयातच गायन कलेत उत्तुंग यश मिळवत भिंगारच्या कार्तिकी गायकवाडनं गायिलेल्या गाण्यातून महाराष्ट्राला वेड लावलं. चार वर्षांपूर्वी तिनं लग्नही केलंय. तिच्या घरात एका बाळाचं आगमन झालं आहे. पण कार्तिकी गायकवाडचा नवरा काय करतो, हे तुम्हाला माहित आहे का? मग ते जाणून घेण्यासाठी ही माहिती सविस्तर वाचा…!
कार्तिकी गायकवाडच्या नवऱ्याचं नाव आहे रोनित पिसे. रोनित हा गायक किंवा डान्सर नाही. तसंच तो जीम ट्रेनरदेखील नाही. रोनित हा शेअर मार्केटच्या जगातला मास्टर आहे. तो ट्रेडिंग करतो.
रोनित उद्योजक, गुंतवणूकदार आणि व्यापारी आहे. profituni_in चा तो फाऊंडर आहे. रोनित पुण्याचा असून त्यानं मेकॅनिकल इंजिनिअरींगमध्ये शिक्षण पूर्ण केलं आहे.
रोनित पिसे मागील सात वर्षांपासून ट्रेडिंग करतोय. त्यात सातत्यानं नफा मिळतोय. ट्रेडिंगमध्ये तो सातत्यानं पैसेदेखील कमावतोय. त्यानं आजवर 18 हजारहून अधिक विद्यार्थ्यांना ट्रेडिंगमध्ये यश मिळवून दिलं आहे.