राज्यातल्या तमाम बहिणींच्या हिताचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ या योजनेअंतर्गत दर २१ ते ६५ वर्षे वयोगटातल्या महिलांना दर महिन्याला १ हजार ५०० रुपये राज्य सरकार देणार आहे. साहजिकच या योजनेचा लाभ मिळावा, या उद्देशानं कागदपत्रं जमा करुन अर्ज देण्यासाठी तलाठी कार्यालयात महिलांची प्रचंड गर्दी होत आहे.
या योजनेसाठी हवी असलेली कागदपत्रं जमा करण्यासाठी महिलांना खूप धावपळ करावी लागत आहे. मात्र यासाठी धावपळ न करता शांतपणे मोजकीच कागदपत्रं सादर करुन या योजनेचा मोठ्या संख्येनं लाभ घ्या, असं आवाहन श्रावणबाळ माता पिता सेवा संघाचे संस्थापक राजेंद्र निंबाळकर यांनी ‘महासत्ता भारत’ न्युज नेटवर्कशी बोलताना केलंय.